आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satyamev Jayate 2: Aamir Khan\'s Fight Against Scams And Corruption

सत्यमेव जयते 2 : भ्रष्टाचारामुळेच देशात गरिबी, प्रत्येकजण 40 लाखांचा मालक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता आमिर खानचा प्रसिद्ध शो ‘सत्यमेव जयते’चा या वेळचा विषय होता भ्रष्टाचार. आमिरने मालक व नोकराच्या एका गोष्टीपासून याची सुरुवात केली. अर्थतज्ज्ञ सुब्रत दास यांनी देशात जमिनीमध्ये पाच हजार लाख कोटी रुपयांची खनिज संपत्ती असल्याचे सांगितले. पूर्ण माहिती न मिळाल्याने हा आकडा निम्म्याहून कमी असल्याचेही ते म्हणाले. हा पैसा देशात सर्वांमध्ये वाटला गेला तर प्रत्येकाला 40-40 लाख रुपये मिळू शकतात. तरीही देशात गरिबी आहे. त्याचे कारण म्हणजे भ्रष्टाचार.

एखादी व्यक्ती सत्तेचा दुरुपयोग करून मोठय़ा प्रमाणावर धन जमा करते. त्यात दुसर्‍याची भागीदारी घटते. ही बाब समजावून सांगण्यासाठी कर्नाटकचे लोकायुक्त जस्टिस संतोष हेडगे आले होते. त्यांनी बेल्लारीतील घोटाळ्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी मीच केली होती. त्यात समजले की, ज्या लोह खनिजासाठी सरकारला प्रतिटन 27 रुपये मिळत होते, ते परदेशात सहा ते सात हजार रुपये टन या दराने विकले जात होते. त्यातही सरकारने दिलेल्या मंजुरीपेक्षा कित्येक पट अधिक उत्खनन करण्यात आले. व्यवसाय सुरू करण्याआधी ज्यांच्याकडे छदामही नव्हता, त्यांनी दोन-तीन वर्षांतच स्वत:चे हेलिकॉप्टर, विमान खरेदी केले. सोन्याचे सिंहासनही तयार करून घेतले. यात राज्याचे तीन मुख्यमंत्री आणि नऊ मंत्र्यांचा समावेश होता. तसेच कनिष्ठापासून ज्येष्ठांपर्यंत 797 अधिकार्‍यांचाही समावेश होता. या घोटाळ्यामुळे सरकारला 16 हजार कोटींचे नुकसान झाले.

आंध्र प्रदेशात सोशल ऑडिट
एसएसटी संस्थेच्या सौम्या किदांबी यांनी सोशल ऑडिटसंदर्भात माहिती दिली. आंध्र प्रदेशात त्यांचा हा प्रयोग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात 120 सामाजिक लेखापरीक्षणे करण्यात आली आहेत. 200 कोटींहून अधिक घोटाळा समोर आला आहे. त्यापैकी 25 ते 30 कोटी वसुलीही करण्यात आली आहे. यात जनतेसमोर 50 रुपयांची लाच परत करण्यासारखीही प्रकरणे आहेत. तसेच 3 हजार जणांना निलंबितही करण्यात आले आहे. पाच हजार लोकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. पण इतर राज्यांत तसा नियम नाही. राजस्थानात सुरुवात झाली, पण सरपंच व आमदारच उपोषणाला बसले होते. त्यामुळे हे बंद करावे लागले.

नरेगातील कामाची मोजणी
सौम्या यांनी एक गोष्टही सांगितली. 2006 मध्ये त्या राजस्थानात काम करत होत्या. एके दिवशी त्या एका ज्येष्ठ महिलेकडे गेल्या. त्या महिलेने त्यांना खायला भाकरी दिली. तिच्याकडे एकच भाकरी होती. दोघींनी अर्धी अर्धी वाटून घेतली. मग त्यांची नजर चुलीजवळच्या लहान लहान खुणांवर गेली. विचारले तेव्हा समजले की, त्यांच्या पतीने नरेगात किती काम केले हे मोजण्याच्या त्या खुणा होत्या. चार वर्षांनंतरही त्याला कामाचा मोबदला मिळाला नसल्याचे समजले. त्यानंतर त्याचा अन् त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला, तरीही पैसे मिळाले नव्हते.

राजस्थानात आरटीआयची सुरुवात
माहिती अधिकार कायद्यासंदर्भात शंकर सिंह आणि निखिल डे यांच्याशी चर्चा झाली. 1994 मध्ये राजस्थानातून याची सुरुवात झाली होती. सरकारी कागदांचे महत्त्व त्यांना समजले. या कागदात संपूर्ण सरकार सामावलेले असते. कागदावरच ते चालते. सरकार आणि जनतेतील संबंधावर सिंह यांनी एक गोष्ट सांगितली. निखिल डे यांनी तक्रार निवारण कायद्यासंदर्भात माहिती दिली. लोकांना आता याचे महत्त्व समजत आहे. हा कायदा आरटीआय पार्ट-टूप्रमाणे असेल.