आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satyamev Jayate Amir Khan Talks About Problem Of Waste In Country

कच-याचा पैसा कच-यातच का? आमिरचा व्यवस्थेला प्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकणा-या ‘सत्यमेव जयते’च्या तिस-या भागात आमिर खानने रविवारी देशभरात परलेल्या कच-याच्या समस्येचा प्रश्न उठवला. शोदरम्यान त्यांनी कचरा आणि दुर्गंधीचा विषय मांडला. तसेच कच-यापासून कशी मुक्ती मिळवायची याचेही उपाय सांगितले.
कच-याच्या समस्येविषयी सांगितले
शोमध्ये सांगितले, की देशातील कोणतेच मोठे शहर कचरामुक्त नाहीये. प्रत्येक शहरात कच-याचे मोठ-मोठे ढिगार बघायला मिळतात. त्यामुळे मानवी जीवन धोक्यात येत आहे. कच-यामुळे गंभीर आजार पसरत आहेत. आमिरने सांगितले, की सरकार स्वच्छतेच्या बाबतीत पूर्णत: शांत बसले आहे. सरकार साफ-सफाईसाठी लाखो रुपये देते परंतु तो पैसा खर्च होतच नाही. उदाहरण म्हणून त्याने मुंबईचे चित्र दाखवले आणि सांगितले, की शहराच्या स्वच्छतेसाठी सरकार वर्षाला 2 कोटींपेक्षा जासत पैसा खर्च करत आहे.
स्वच्छतेच्या नावावर होतोय घोटाळा
इतकी मोठी रक्कम खर्च होऊन सुध्दा स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले आहेत. स्वच्छता का होत नाही. याविषयावर बोलण्यासाठी त्याच्या शोमध्ये सामाजिक कार्यकर्ता ऋषि अग्रवाल यांना बोलवले होते. ऋषि यांनी देशात स्वच्छतेच्या नावावर कसे घोटाळे होते आहेत याविषयी सांगितले. ते पुढे म्हणाले, की ज्या ठिकाणी डंपिंग केले जाते ती सरकारी जमिन असते. परंतु या जमिनीवर कचरा टाकण्यासाठीसुध्दा पैसे घेतले जाते. या जमिनीला खासगी कंपनीच्या ताब्यात दिले जाते. त्यानंतर तिथे जेवढे ट्रक कचरा फेकला जातो त्याप्रमाणे पैसे दिले जातात. एका ट्रकसाठी 500 पासून 2000 रुपयांपर्यत कच-याचे पैसे मिळतात.
या समस्येचे काय आहे समाधान?
कचरामुक्तीसाठी शोमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले. ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाकावा. या व्यतिरिक्त ओल्या कच-यापासून बायोगॅस तयार केला जाऊ शकतो आणि डंपिंगच्या ठिकाणी कसलीही शेती केली जाऊ शकते. उदाहरण म्हणून आमिरने मुंबईचे एक डंपिंग ग्राउंड दाखवले. तिथे हजारो टन कच-याचे ढिगार साचलेले आहे. त्यामध्ये वैज्ञानिक पध्दतीने कमळाची शेती केली जात आहे. या शेतीसाठी फक्त तीन लाखांचा खर्च आला आहे.