आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सत्यमेव जयते-2’: आमिरने विचारले, देश श्रीमंत, जनता गरीब का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानने लोकप्रिय टीव्ही चॅट शो 'सत्यमेव जयते 2'च्या चौथ्या एपिसोडमध्ये भ्रष्टाचार या विषयाच्या माध्यमातून देशातील गरीबीचा गंभीर मुद्दा समोर आणला. देश श्रीमंत आणि देशातील जनता गरीब का? असा शोदरम्यान त्याने पुन्हा एकदा व्यवस्थेला प्रश्न केला. हा विषय समजून घेण्यासाठी सुरूवातीला आमिरने स्वत: काही उदाहरणे दिली आणि त्यानंतर शोमध्ये बोलवण्यात आलेल्या तज्ञांकडून या मुद्यावर प्रकाश टाकला.
आमिरने जनतेला हा मुद्दा स्पष्ट समजण्यासाठी एक विनोदसुध्दा सांगितला. त्याने मालक जनता आणि नोकर सरकार
असल्याचा एक विनोद सांगितला. त्यामध्ये नोकर मालकाला मुर्ख बनवून सर्व दुध चोरून नेतो. म्हणजे समाजात कशाप्रकारे घोटाळे होतात आणि आपण त्यात कसे मुर्ख ठरतो याचे त्याने या विनोदाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले.
आमिरने चौथ्या एपिसोडमध्ये देशाच्या मालमत्तेचा मुद्दा मांडला. त्याने सांगितले, की देशातील भ्रष्टाचार वाढत असल्याने जनता विकासाकडे वळत नाहीये. त्याने असाही प्रश्न उपस्थित केला, की गरीबी आणि बेरोजगारीशी देश लढत आहे, परंतु असे का?
प्रत्येक व्यक्ती भरतो टॅक्स
शोमध्ये आलेली पाहूणी यामिनी अय्यर यांनी सांगितले, की आज देशात प्रत्येक व्यक्ती टॅक्स भरतो. त्यातील अधिक लोकांना वाटते, की आपण कधीच टॅक्स भरत नाही. तसे पाहता टॅक्स प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या वस्तूच्या माध्यमातून भरत असतो. परंतु त्याला ते माहितच होत नाही.
यामिनी यांनी असेही सांगितले, की टॅक्सचे दोन प्रकारचे असतात-
1- प्रत्यक्ष टॅक्स(Direct Tax)
2- अप्रत्यक्ष टॅक्स(Indirect Tax)
प्रत्यक्ष टॅक्सला 'इनकम टॅक्स' म्हटले जाते. जर टूथपेस्ट, ब्रश, मोबाइलसारख्या वस्तू आणि इतर खाद्यपदार्थ खरेदी केले तर त्याच्या माध्यमातून आपण अप्रत्यक्ष टॅक्स भरतो.
या टॅक्सच्या पैशांनीच देशाचा विकास होतो. परंतु हे पैसे जनतेपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. कारण भ्रष्टाचार करणारे लोक आणि खासगी कंपन्या त्यांचे इनकम त्यातून काढून घेतात. या गोष्टींमुळेच देशाच्या विकासात मोठा अडथळा निर्माण होतो आणि जनता गरीबीला समोरे जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या विशेष कारणांमुळे होतोय देशाचा विकास?