('सत्यमेव जयते'च्या प्रोमोमधील एक सीन)
मुंबई: आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या टीव्ही शोचे तीसरे पर्व पुढील महिन्यात सुरु होत आहे. अलीकडेच, या शोचा फर्स्ट प्रोमो मायक्रोब्लॉगिंग साइट टि्वटरवर लाँच करण्यात आला. या प्रोमोसह आमिरने लिहिले, 'सत्यमेव जयतेचे तिसरे पर्व 5 ऑक्टोंबरपासून सुरु होत आहे. प्रोमो पाहून सांगा काय वाटतयं.'
या टीजरमध्ये एक बस कंडक्टर प्रवाशांचे तिकीट काढत आहे. त्याचवेळी त्याची नजर एका तरुणावर जाते. तो तरुण बसमध्ये बसेलल्या एका तरुणीकडे एकटक बघत असतो. त्यावेळी कंडक्टर त्याला म्हणतो, "भाई 'सत्यमेव जयते' फिर से शुरू हो रहा है। संडे को सुबह 11 बजे. तुम देखना जरूर."
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिरचे टि्वट आणि 'सत्यमेव जयते'चा प्रोमो...