आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सत्यमेव जयते-2\'चा शेवटचा भाग, आमिरने केले मत न विकण्याचे अपिल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता आमिर खानचा प्रसिद्ध टीव्ही शो 'सत्यमेव जयते-2'चा आज (30 मार्च) शेवटचा भाग प्रसारित झाला. या भागात आमिरने राजकारण्यांचे सत्य मतदारांसमोर ठेवले. जनता कोणाला मतदार करत आहे, आणि त्यामुळे देशाचे केवढे नुकसान होत आहे, हे वास्तव आज 'सत्यमेव जयते-2'च्या माध्यमातून त्याने मांडले. त्यासोबत मतदान करताना कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे, हे देखील सांगितले.
देशात सध्या निवडणूकीचे वारा वाहात आहे. त्यामुळेच आमिरने त्याच्या लोकप्रिय कार्यक्रमाचा शेवट मतदार जागृतीने केला. याविषयावर चर्चा करण्यासाठी कार्यक्रमात अनेक लोकांना सहभागी करुन घेण्यात आले. त्याने सर्वप्रथम प्रा. जयदीप यांच्याशी बातचीत केली. त्यांनी 2012 च्या आकडेवारीनुसार सांगितले, की आज लोकसभेत 543 खासदार आहेत. त्यातील 162 सदस्यांवर गुन्हेगारी खटले सुरु आहेत. 52 खासदारांवर गंभीर आरोप आहेत. अनेक खासदारांवर तर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, दरोडा आणि बलात्कारा सारखे गुन्हे दाखल आहेत.
गुन्हेगारांना सत्तेपासून दूर ठेवा
कार्यक्रमातील पाहुणे माजी आयपीएस अधिकारी डी.एन. गौतम म्हणाले, की गुन्हेगारांनी सत्तेचा सोपान चढणे अतिशय धोकादायक आहे. करण गुन्हागार किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सत्ते आले तर, कायद्याला काही अर्थच उरत नाही. कायद्याचे पुस्तक बाद होते आणि त्याऐवजी चांडाळांचे पुस्तक त्याची जागा घेते. गुन्हेगारांना सत्तेपासून दूर ठेवले तर, मात्र हे टाळता येते.