आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See The Personal Life Pics Of TV\'s Rama Aka Arun Govil

हे आहे TVवरील प्रसिद्ध \'राम\'चे खरे कुटुंब, पाहा पर्सनल लाइफ Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, अरुण गोविल, मुलगी सोनिका आणि पत्नी श्रीलेखा)
मुंबईः अरुण गोविल टीव्ही इंडस्ट्रीतील असे एक अभिनेते आहेत, जे 1986 पासून ते आत्तापर्यंत रामच्या प्रतिमेतून बाहेर पडू शकलेले नाहीत. रामायण या प्रसिद्ध मालिकेला 28 वर्षे झाली आहेत. मात्र आजही अरुण गोविल टीव्हीवरील रामच्या रुपातच ओळखले जातात. अरुण यांनी रामायण या मालिकेव्यतिरिक्त अनेक मालिकांमध्ये काम केले. मात्र जेवढी लोकप्रियता त्यांना रामच्या भूमिकेने मिळवून दिली, तेवढी इतर मालिकांमधून मिळू शकली नाही. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
राम नगरमध्ये झाला जन्म...
टीव्हीवरी राम अर्थातच अभिनेते अरुण गोविल यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1958 रोजी उत्तरप्रदेशातील राम नगर (मेरठ) येथे झाला. मेरठमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी रंगभूमीवर काही नाटकांमधअये अभिनेय केला. अरुण यांनी सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र अरुण यांना काहीतरी वेगळे करायचे होते. बिझनेस करायच्या निमित्ताने ते मुंबईत आले खरे, मात्र त्यांनी अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला.
मोठ्या पडद्यावर मिळाली पहिली संधीः
अरुण यांना खरी प्रसिद्धी छोट्या पडद्याने मिळवून दिली. मात्र त्यांना पहिला ब्रेक 1977 मध्ये ताराचंद बडजात्या यांच्या पहेली या सिनेमात मिळाला. त्यानंतर त्यांनी 'सावन को आने दो' (1979), 'सांच को आंच नहीं' (1979), 'इतनी सी बात' (1981), 'हिम्मतवाला' (1983), दिलवाला' (1986), 'हथकडी' (1995) आणि 'लव कुश' (1997) या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
छोट्या पडद्यावर रामपूर्वी मिळाली होती विक्रमादित्यची भूमिकाः
रामानंद सादर यांच्या विक्रम और बेताल या मालिकेत अरुण गोविल यांना राजा विक्रमादित्यची भूमिका मिळाली होती. या मालिकेला मिळालेल्या अफाट लोकप्रियतेनंतर 1987 मध्ये रामानंद सागर यांनी रामायण या मालिकेत त्यांना राम ही प्रमुख भूमिका ऑफर केली. ही भूमिका एवढी गाजली, की आजही लोक त्यांना टीव्हीवरील रामाच्या रुपात ओळखतात. अरुण यांनी 'लव कुश' (1989), 'कैसे कहूं' (2001), 'बुद्धा' (1996), 'अपराजिता', 'वो हुए न हमारे' आणि 'प्यार की कश्ती में' या गाजलेल्या मालिकांमध्येही अभिनय केला आहे.
अरुण यांचे कुटुंबः
अरुण यांना पाच भाऊ आणि दोन बहिणी आहेत. आठ बहीणभावंडांमध्ये अरुण चौथ्या क्रमांकावर येतात. त्यांच्या पत्नीचे नाव श्रीलेखा गोविल आहे. अरुण आणि श्रीलेखा या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अमल हे मुलाचे तर सोनिका हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. मुलगा अमल याचे लग्न झाले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मुलगा आणि सूनेसोबतचे अरुण यांचे छायाचित्र...

नोटः 3 ऑक्टोबर रोजी देशभरात विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या विजयाच्या आठवणी जगाविण्याकरीता या दिवशी रावण दहनाचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने divyamarathi.comचे हे विशेष सादरीकरण...