Home »TV Guide» Serial Porus On Location Photos

Behind The Scene Photos: 500 कोटींच्या बजेटमध्ये बनतोय हा TV शो

दिव्य मराठी वेब टीम | Aug 11, 2017, 13:03 PM IST

मुंबई - सोनी चॅनलवर लवकरच नवीन शो पोरस सुरु होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शोचे बजेट 500 कोटी आहे. पण याबद्दल अजून अदिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या शोमध्ये लक्ष लालवानी, रति पांडे, मोहित अबरोल, रोहित पुरोहित आणि सुहानी धानकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मालिकेमध्ये सिद्धार्थ कुमारी तिवारीने स्वस्तिक प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवण्यात आले आहे. सिद्धार्थने पहिले 'शनि' और 'महाकाली : अंत ही शुरुआत है' यांसारखे शो बनवले आहेत. अशी आहे शोची कथा...
पोरस प्राचीन भारतात परुर्वा राजचे राजा होते, जे पंजाब, चेनाब आणि झेलम नदीमध्ये होते. जेव्हा विश्वविजेता बनण्याचे स्वप्न घेऊन मकदूनिया (यूनान) प्रांताचा राजा भारतात पोहोचला तेव्हा पोरससोबत त्याचा सामना झाला. असे म्हणतात की, थीव्स, मिस्र, इराक, मध्य एशिया, हिरात, काबुल आणि समरकंदला जिंकून भारतमध्ये पोहोचला तेव्हा सिकंदरचा विजय रथ पोरसनेच अडवला होता.

मालिकेत पोरसचा रोल लक्ष ललवानीने केला आहे तर सिकंदरचा रोल रोहित पुरोहीतने केला आहे. अनुसुयाचा रोल रति पांडे तर प्रिंसेस लाचीची भूमिका सुहानी धानकीने केला आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, पोरस शोचे काही ऑनलोकेशन PHOTOS..

Next Article

Recommended