आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WEDDING PHOTOS : 'ससुराल सिमर का' फेम ही अभिनेत्री बनली वाराणसीची सून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री ज्योत्सना चंदोला)
वाराणसीः छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'ससुराल सिमर का' या मालिकेत खुशी हे पात्र साकारणारी अभिनेत्री ज्योत्सना चंदोला अलीकडेच लग्नगाठीत अडकली. दिग्दर्शक नितेश सिंहसोबत ज्योत्सनाने सप्तपदी घेतल्या. वाराणसीच्या कॅन्टोमेंटस्थित एका हॉटेलमध्ये दोघांचे थाटात लग्न झाले.
ज्योत्सनाने आपल्या लग्नात परिधान केलेला लहेंगा तिला तिच्या एका खास मैत्रिणीने भेट म्हणून दिला होता. ज्योत्सनाच्या लग्नाच्या सर्व विधी वाराणसीमध्येच पार पडल्या.
'हॉन्टेड हाऊस' मालिकेच्या सेटवर जुळले होते सूत..
ज्योत्सना आणि नितेश यांची भेट 'हॉन्टेड हाऊस' या मालिकेच्या सेटवर झाली होती. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र आपल्या मनातील गोष्ट सांगायला दोघांनाही थोडा काळ लागला होता.
ज्योत्सनाचे पती नितेश यांचे शिक्षण वाराणसीतच झाले. बीएचयूमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईत आले. येथे त्यांनी सहायक दिग्दर्शकाच्या रुपात कामाला सुरुवात केली. नितेश यांनी 'आहट' या गाजलेल्या शोचे दिग्दर्शन केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ज्योत्सना आणि नितेश यांच्या लग्नसोहळ्याची खास छायाचित्रे...