आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Bossमध्ये शाहरुख-सलमानची धमाल-मस्ती, एकमेकांना मारली थोबाडीत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Bigg Boss 9च्या सेटवर सलमान खान आणि शाहरुख खान - Divya Marathi
Bigg Boss 9च्या सेटवर सलमान खान आणि शाहरुख खान
मुंबई- सुपरस्टार शाहरुख खान शनिवारी रात्री (19 डिसेंबर) 'बिग बॉस'चा पाहूणा झाला होता. यादरम्यान त्याची आणि होस्ट सलमान खानची बाँडिंग पाहण्यासारखी होती. सेटवर दोघांनी धमाल-मस्ती केली आणि एका स्पेशल टास्कमध्ये एकमेकांच्या थोबाडीतसुध्दा मारली. या टास्कमध्ये दोघांना एकमेकांना काही प्रश्न विचारायचे होते आणि चुकीचे उत्तर मिळाल्यास थोबाडीत खायची होती.
कसे होते प्रश्न-
सर्व प्रश्न सलमान आणि शाहरुखच्या पर्सनल आयुष्याविषयी होते. सलमानने शाहरुखला विचारले, की मी ब्रश न करताच चहा पितो का? शाहरुखचे उत्तर होते, नाही. सलमानच्या सांगण्यानुसार उत्तर चुकीचे होते आणि अखेर शाहरुखला सलमानची थापड पडलीच. अशाचप्रकारे शाहरुखने सलमानला विचारले, 'आपण किती सिनेमे एकत्र केले आहेत?' सलमानचे उत्तर होते 'सहा' आणि हे बरोबर होते. अशाच एक प्रश्न शाहरुखचा होता, की कोणत्या सिनेमात त्याने 'राहूल नाम तो सुना होगा' डायलॉग म्हटला आहे. यावर सलमानने उत्तर दिले, 'जुनून' आणि उत्तर चुकले. अखेर सलमानलाही शाहरुखची थापड खावी लागली.
सलमानने शाहरुखला मारली होती लाथ-
'बिग बॉस'दरम्यान सलमान आणि शाहरुखने भूतकाळातील काही गोष्टी आठवल्या. यामध्ये एक होती, की 'करन-अर्जुन'च्या शूटिंगदरम्यान सलमानने शाहरुखला लाथ मारून बेडवरून खाली ढकलून दिले होते. सलमानच्या सांगण्यानुसार, 'शाहरुख झोपण्यासाठी माझ्या खोलीत आला. झोप लागताच शाहरुख जोरजोरात घोरू लागला. त्यामुळे सलमान आणि खोलीत असलेल्या इतरम मित्रांनी त्रस्त होऊन शाहरुखचे घोरणे थांबवण्यासाठी त्याला लाथ मारून बेडवरून खाली पाडले होते.' सलमानच्या या स्टोरीवर शाहरुखने स्पष्टीकरण दिले, की त्यावेळी सायनसमुळे त्याचे नाक बंद झाले होते.
थंड पाण्याने अंघोळ करतो सलमान-
सलमान-शाहरुखच्या मीटींगदरम्यान खुलासा झाला, की सलमान दररोज थंड पाण्याने अंघोळ करतो. हिवाळा असो अथवा उन्हाळा सलमान प्रत्येक ऋतूमध्ये अंघोळीसाठी थंड पाण्याचा वापर करतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'मधील शाहरुख आणि सलमानच्या गपशपचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...