आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे स्मृती ईराणीची सावत्र मुलगी, शाहरुख खानने शेअर केला PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मृती ईराणी आणि शैनेल ईराणी - Divya Marathi
स्मृती ईराणी आणि शैनेल ईराणी
मुंबईः अभिनेता शाहरुख खानने इन्स्टाग्रामवर स्मृती ईराणीची सावत्र मुलगी शैनेलचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन शाहरुखने लिहिले, "माझा बालपणीचा मित्र जुबिनची मुलगी आता मोठी झाली असून अतिशय सुंदर दिसते. मी तिचे बारसे केले होते."  शैनेल ही स्मृती ईराणींचे पती जुबिन आणि त्यांची पहिली पत्नी मोना ईराणीची मुलगी आहे. स्मृती ईराणी या जुबिन यांच्या दुस-या पत्नी असून या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. जोहर हे त्यांच्या मुलाचे तर जोइश हे मुलीचे नाव आहे. 
 
2001 मध्ये झाले होते स्मृती-जुबिनचे लग्न...
- स्मृती इराणीचे पती जुबिन ईराणी हे शाहरुख खानचे बालपणीचे मित्र आहेत.
- 2001मध्ये स्मृती यांनी पारसी एन्टरप्रेन्योर जुबिन ईराणीसोबत लग्न केले. लग्नानंतर स्मृती यांना स्मृती ईराणी या नावाने ओळखले जाते. स्मृती यांचा जन्म मल्होत्रा कुटुंबात झाला. 
- जुबिन यांची पहिली पत्नी मोना या स्मृतीच्या बेस्ट फ्रेंड होत्या तर जुबिन आणि स्मृती हे दोघे बालपणीचे मित्र आहेत. मात्र जुबिन यांनी मोनासोबत लग्न थाटले. 
- नंतर जुबिन यांचे स्मृती ईराणीसोबत सूत जुळले आणि त्यांनी स्मृतीसोबत लग्न करण्यासाठी पहिली पत्नी मोनाला घटस्फोट दिला.  

पुढील स्लाईड्सवर बघा, स्मृती आणि मोनासोबत शैनेलचे 5 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...