आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: या निमित्ताने करीनाचा नवरा आणि एक्सबॉयफ्रेंड आले समोरासमोर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिल्म इंडस्ट्रीची दुनियाच न्यारी आहे. येथे कधीही कुणाचा शत्रू आणि मित्र बनू शकतो. अलीकडेच काहीसा असा नजारा बघायला मिळाला. अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरचा नवरा सैफ अली खान एका मंचावर आले. निमित्त होते 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोच्या सेटवर आगामी 'फँटम' या सिनेमाच्या प्रमोशनचे. सैफ अली खान आणि कतरिना कैफ स्टारर 'फँटम' हा सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे. या निमित्ताने हे दोघेही शाहिद कपूर होस्ट करत असलेल्या 'झलक दिखला जा' या शोमध्ये प्रमोशनसाठी आले होते.
यावेळी शाहिद आणि सैफ यांच्यात चांगले बाँडिंग पाहायला मिळाले. या दोघांचा एक सेल्फी
निर्माता करण जोहरने सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केला आहे. करणने हे छायाचित्र पोस्ट करुन लिहिले, ''जब दे मेट (#jabtheymet)''.
करीना आणि शाहिद कपूर यांनी 'जब वुई मेट' या सिनेमात एकत्र काम केले होते. त्याकाळात दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर करीनाच्या आयुष्यात सैफची एन्ट्री झाली. तर गेल्याच महिन्यात शाहिदसुद्धा लग्नगाठीत अडकला.
विशेष म्हणजे शाहिदने सैफ आणि करीनाला त्याच्या लग्नात आमंत्रित केले होते. मात्र दोघेही लग्नात अनुपस्थित होते. 'झलक...'च्या सेटवर सैफ आणि शाहिद एकत्र थिरकताना दिसले. त्यांच्यासोबत कतरिना कैफनेही ताल धरला होता.
पुढे पाहा, 'झलक...'च्या सेटवर क्लिक झालेली सैफ, शाहिदची छायाचित्रे...