आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Happy New Year Team Celebrates Diwali With Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

Pics: 'तारक मेहता..'च्या सेटवर शाहरुख-दीपिकाचे दिवाळी सेलिब्रेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(L-R शोच्या सेटवर दीपिका पदुकोण, शाहरुख खान, दिलीप जोशी (जेठालाल), दिशा वखानी (दया बेन), निर्माते असित कुमार मोदी)
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची टीम सध्या आपल्या आगामी 'हॅपी न्यू इयर' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अलीकडेच प्रमोशनच्या निमित्ताने शाहरुख-दीपिकासह सिनेमातील इतर कलाकार 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या सेटवर पोहोचले होते. येथे गोकुळधाम सोसायटीच्या लोकांसोबत त्यांनी दिवाळीचे सेलिब्रेशन केले.
दिवाळी स्पेशल एपिसोडच्या शूटिंगनंतर शाहरुखने ट्विट केले, ''तारक मेहता...च्या सेटवर उपस्थिती लावून खूप मजा आली. हॅपी न्यू इयरच्या टीमकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांचे आभार.''
शोमध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी म्हणाले, की शाहरुखसारख्या सुपरस्टारसोबत शूटिंग करतानाचा अनुभव खूप छान होता. शोमध्ये शाहरुख आणि त्याच्या टीमसाठी स्पेशल गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मालिकेचे निर्माते असित कुमार यांनीही हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गोकुळधाम सोसायटीत पोहोचलेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...