आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Were Smoking On The Set Of \'jhalak Dikhla Ja\'

शाहरुखची सिगारेटची सवय सुटता सुटेना... माधुरी शेजारी बसून घेत होता कश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुखला सिगारेटचे व्यसन असल्याचे त्याच्या चाहत्यांना ठाऊकच आहे. एकेकाळी शाहरुख चेन-स्मोकर होता. शाहरुखने अनेकदा सिगारेट सोडल्याचा दावा केला आहे, मात्र त्याची सिगारेटची सवय काही केल्या सुटता सुटत नाहीये.
आता आम्ही शाहरुखच्या या व्यसनाबद्दल का बोलतोय... हाच विचार तुमच्या मनात डोकावला असेल ना. खरं तर सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी सहसा सिगारेट ओढण्याचे टाळत असतात. मात्र शाहरुख याला अपवाद आहे.

अलीकडेच शाहरुख 'झलक दिखला जा' या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. रंजक गोष्ट म्हणजे शाहरुखने सेटवरच सिगारेट ओढायला सुरुवात केली. त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शोची जज माधुरी दीक्षितच्या शेजारी बसून शाहरुख सिगारेटचे कश घेत होता.

शाहरुख या शोमध्ये आपल्या आगामी 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. शाहरुखने यावेळी सेटवर भरपूर मस्ती केली. शिवाय माधुरी आणि स्पर्धकांबरोबर तालही धरला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा यावेळी क्लिक झालेली खास छायाचित्रे...