आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Big Boss-8 : पक्षपाताच्या आरोपांमुळे नाराज सलमान, शाहरुख होणार नवीन होस्ट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान आणि शाहरुख खान)
मुंबई- वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चे आठवे पर्व सुरू होण्याच्या आधीच सगळीकडे चर्चेत आहे. एकीकडे स्पर्धकांबद्दल अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत, तर दुसरीकडे शोच्या होस्टबद्दल पेच निर्माण झाला आहे. अशी बातमी आहे, की यावेळी सलमानने हा शो होस्ट करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता शाहरुख खान 'बिग बॉस'चे आठवे पर्व होस्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सलमान पक्षपाताच्या आरोपांमुळे नाराज आहे आणि म्हणूनच त्याने या शोचे पुढचे पर्व होस्ट करण्यास नकार दिला आहे, असे म्हटले जात आहे. निर्माते त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता निर्माते दबंग खानची नाराजी दूर करू शकतात की नाही आणि शाहरुख सलमानची जागा घेतो की नाही हे पाहणे रंजक ठरेल.
आतापर्यंत चार सीझनचा होस्ट होता सलमान...
सलमान खानने आतापर्यंत 'बिग बॉस' या कार्यक्रमाचे चार सीजन (2010, 2011, 2012 आणि 2013) होस्ट केले आहेत, तर कार्यक्रमाच्या पाचव्या सीजनमध्ये संजय दत्त त्याचा को-होस्ट होता.

सलमानने होस्ट केलेल्या सगळ्या सीझन्सच्या विजेत्यांची यादी...
बिग बॉस-4 (2010) - श्वेता तिवारी (बक्षिसाची रक्कम : एक कोटी )
बिग बॉस-5 (2011) - जूही परमार (बक्षिसाची रक्कम : एक कोटी)
बिग बॉस-6 (2012) - उर्वशी ढोलकिया (बक्षिसाची रक्कम : 50 लाख)
बिग बॉस-7 (2013) - गौहर खान ( बक्षिसाची रक्कम : 50 लाख)
पुढील स्लाइड्वर वाचा कोण कोण होते 'बिग बॉस'चे होस्ट..