आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा अडचणीत आला किंग खान शाहरुख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षीच्या आयपीएल मॅचदरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि शाहरुख खानमध्ये बाचाबाची झाली होती. या वादानंतर कोलकता नाइट रायडर्सचा मालक असलेल्या शाहरुखला पुढील पाच वर्षांसाठी वानखेडे स्टेडियममध्ये येण्यास मनाई करण्यात आली. हा वाद असतानाच आता शाहरुखसमोर पुन्हा एक अडचण निर्माण झाली आहे.
चाईल्ड राईट्स कमिशनने शाहरुखविरोधात पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे. शाहरुख आणि अधिका-यांमध्ये ज्यावेळी भांडण झाले, त्यावेळी लहान मुले तिथे उपस्थित होती. शाहरुखने या वादाच्यावेळी अपशब्दांचा वापर केला, त्याचा वाईट परिणाम लहान मुलांवर झाला असल्याचे चाईल्ड राईट कमिशनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ८ ऑगस्टला ही तक्रार दाखल केली गेली. येत्या २३ ऑगस्टपर्यंत शाहरुखला यासंदर्भात स्पष्टीकरण द्यायचे आहे.
क्रिकेटनंतर शाहरुख खान उतरणार शिक्षण क्षेत्रात
IPL PHOTOS : अखेर धोनी हरला अन् गंभीर हसला तर शाहरुख भलताच खूष
शाहरुख खानला वानखे़डे स्टेडियमवर येण्यास ५ वर्षांची बंदी
IPL सामन्यात शाहरुख एकटाच, काय गौरी अजूनही आहे नाराज?