आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तीला पाहून कतरिनाला बसला होता धक्का, जवळ जाऊन म्हणाली.. प्राऊड ऑफ यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - डान्स प्लस सिझन 3 च्या शोची कॅप्टन शक्ती मोहन शोच्या प्रमोशनसाठी गुरुवारी लखनऊला आली होती. त्यावेळी तिने सांगितले की, यावेळी कॉम्पिटिशन अधिकच कठीण असणार आहे. यावेळी थीम 'एक लेवल अप' आहे असे ती म्हणाली. आमच्या प्रतिनिधीबरोबर केलेल्या खास चर्चेत तिने पर्सनल लाईफशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या. 
 
कतरिनाला बसला धक्का.. 
- शक्त‍ि सांगते मुलगी असल्याने तिचा मार्ग सोपा नव्हता. जेव्हा तिने डान्सर आणि तिच्या बहीणीने सिंगर बनण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी तिच्या नातेवाईकांनी बरेच काही उलटे सुटले बोलले होते. 
- तिची बहीण जेव्हा पॉप स्टारमध्ये निवडली गेली त्यावेळी मी आनंदाने माझ्या आत्याला सांगू लागले. त्यावर त्यांचे उत्तर होते, त्यात काय विशेष आम्हीही हे सर्व केले आहे पण अखेर पुढे जाऊन स्वयंपाकच करत बसावा लागतो. 
- मम्मी-पप्पाला लोक नेहमी म्हणतात, असा वेळ का वाया घालवत आहात. हे वाईट काम आहे. पैसे कमावण्यासाठी मुलींना असे काम करायला लावता. 
- वडिलांनी मात्र आम्हाला कधीही काहीही करण्यापासून अडवले नाही. ज्यादिवशी आम्ही टीव्हीवर आलो, सर्वांचाच दृष्टीकोन आपोआप बदलला. 
- आयुष्यातील अविस्मरणीय क्षण सांगताना शक्ती म्हणाली, डान्स प्लस सिझन-2 मध्ये मी जज होते. त्यावेळी कतरिना फँटमच्या प्रमोशनसाठी आली होती. मला पाहून तिला धक्का बसला होता. 
- त्याचे कारण म्हणजे धूम 3 मध्ये कमली गाण्यात मी वैभवी मर्चेंट यांना असिस्ट केले होते. तेव्हा मी कतरिनाला डान्स स्टेप्स शिकवायचे. त्याला वर्ष होऊन गेलेले होते. कतरिना मला ओळखेल असे मला वाटलेही नव्हते. 
- पण जेव्हा तिने मला जजच्या खुर्चीवर पाहिले तेव्हा ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, 'आय अॅम प्राऊड ऑफ यू'

पुढील स्लाइड्सवर वाचा, शक्तीच्या आजवरच्या प्रवासाबाबत.. 
बातम्या आणखी आहेत...