एंटरटेनमेंट डेस्क - भारतातील टीव्ही इतिहासातील लहान मुलांची सर्वात आवडती मालिका 'शक्तीमान' कोण बरे विसरु शकेल? याच मालिकेतून घराघरातील लहान मुलांचे फेवरेट मुकेश खन्ना आज त्यांचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मुकेश खन्ना यांना त्यांच्या शक्तीमान च्या रोलसाठी तसेच बी.आर.चोप्राच्या 'महाभारता'तील भीष्म पितामहच्या रोलसाठी आजही ओळखले जाते. वयाच्या साठीत असूनही मुकेश खन्ना अविवाहीत आहेत. इतक्या वर्षात त्यांचे नाव कधीही कोणत्याच अभिनेत्रीसोबत जोडले गेले नाही.
मुकेश खन्ना हे 'चिल्ड्रेन फिल्म सोसायटी ऑफ इंडिया'चे चेअरमनही आहेत.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी मुकेश खन्ना यांच्याविषयी..