आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदरने केला साखरपुडा, दुबईच्या 7 स्टार हॉटेलमध्ये झाला कार्यक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साखरपुड्यादरम्यान जेम्स मिलिरॉनसोबत शमा सिकंदर - Divya Marathi
साखरपुड्यादरम्यान जेम्स मिलिरॉनसोबत शमा सिकंदर
दुबई- अभिनेत्री शमा सिकंदरने जेम्स मिलिरॉन नावाच्या व्यक्तीसोबत साखरपुडा केला आहे. ही सेरेमनी दुबईच्या 7 स्टार हॉटेल बुर्ज अली अरबमध्ये झाली. सूत्रांच्या सांगण्यानुसार, न्यू ईअर ईव्हवर जेम्सने शमाला अंगठी देऊन प्रपोज केले. या प्रसंगाने शमा अचंबित झाली. तिने याची कल्पनासुध्दा केली नव्हती. याच कारणाने हे मुमेंट्स तिच्यासाठी भावूक होते.
जेम्स मिळाल्याने स्वत:ला लकी समजते शमा...
काही दिवसांपूर्वी शमाने divyamarathi.comसोबत बातचीत करताना जेम्सविषयी सांगितले होते, 'जेम्स चांगली व्यक्ती आहेत. तो माझी खूप काळजी घेतो, हीच त्याची मला आवडणारी सर्वात चांगली गोष्ट आहे. जेम्सला मिळवून मी खूप आनंदी आहे आणि स्वत:ला लकी मानते.'
जेम्सपूर्वी शमा अमेरिकेचा मूळ रहिवाशी अभिनेता ओ नीलला डेट करत होती. चार वर्षे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. काही महिन्यांपूर्वीचे दोघे वेगळे झाले आहेत.
पुढील स्लाइड्सव क्लिक करून पाहा शमा सिकंदरच्या साखरपुड्याचे फोटो...