मुंबई- काही दिवसांपूर्वी बातमी आली होती, की अभिनेत्री सनाया ईराणी डान्सिंग रिअॅलिटी शो 'झलक दिख ला जा'च्या सरावादरम्या जखमी झाली होती. आता या शोमध्ये अभिनेत्री शमिता शेट्टीसुध्दा जखमी झाली आहे. शोच्या परफॉर्मन्सचा सराव करत असताना शमिताच्या नाकाला जखम झाली आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'शमिता आगामी एपिसोडसाठी सराव करत होती. त्यादरम्यान तिच्यासोबत हा अपघात घडला. तिच्या नाकाला जखम झाली आहे. ती त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या नसांमध्ये फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून ती सराव करत नाहीये. डॉक्टरांनी तिला दोन आठवडे आराम करण्यास सांगितला आहे. मात्र जखमी असूनदेखील शमिता परफॉर्म देणार आहे. कारण तिला आपल्या सपोर्ट्सना निराश करायचे नाहीये.'
36 वर्षीय शमिता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण आहे. 2009मध्ये 'बिग बॉस'मध्ये शमिता दिसली होती. तिने 'झलक...'मधून तिने दिर्घकाळानंतर कॅमेरा फेस केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शमिताचे परफॉर्मन्सची काही छायाचित्रे...