आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sharad Malhotra And Divyanka Tripathi At Ganpati Visarjan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TV अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने बॉयफ्रेंडसह केली श्रींची महाआरती, पाहा Pix

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्रींची महाआरती करताना शरद मल्होत्रा आणि दिव्यांका त्रिपाठी)
मुंबई - टीव्ही अभिनेता शरद मल्होत्राने रविवारी आपल्या बाप्पाला निरोप दिला. श्रींच्या विसर्जनापूर्वी त्याने आपल्या घरी महाआरतीचे आयोजन केले होते. या महाआरतीत शरदची कथित गर्लफेंड दिव्यांका त्रिपाठी आपल्या आईवडिलांसह सहभागी झाली होती. विशेष म्हणजे, या c सहभागी होण्यासाठी दिव्यांकाचे आईवडील खास भोपाळहून मुंबईत पोहोचले होते.
शरद मल्होत्राने महाआरती आणि विसर्जनाविषयी सांगताना म्हटले, "आज ही महाआरती करण्यासाठी सात पंडित आले होते. गन्नू बप्पा माझ्या घरुन जात असल्यामुळे मला दुःख होत आहे. ते केवळ तीन दिवसांपूर्वीच तर आले होते. मात्र आज त्यांना निरोप दिला जातोय. आम्ही पुढील वर्षी पुन्हा त्यांचे उत्साहात स्वागत करु."
तर दिव्यांका म्हणाली, "गन्नी बप्पा माझे आवडते दैवत आहे. ते नेहमी शरद आणि माझ्या पाठीशी असतात. आपल्या बिझी शेड्युलमुळे मी गणेशोत्सवाच्या तयारीत जास्त हातभार लावू शकली नाही. मात्र शरदने सर्वकाही मॅनेज केले. माझे आईवडील या सणासाठी खास भोपाळहून मुंबईत आले आहेत. हा एक कौटुंबिक समारंभ होता. माझ्या आणि शरदच्या आईवडिलांनी मिळून आरती केली."
शरदसह कधी लग्नगाठीत अडकणार, असा प्रश्न दिव्यांकाला विचारला असता, ती म्हणाली आता याविषयी बोलणे खूप जास्त घाऊ होईल. आम्ही जेव्हा लग्न करु, तेव्हा याविषयी नक्की सर्वांना सांगू.
आठ वर्षांपासून आहेत रिलेशनशिपमध्ये...
शरद आणि दिव्यांका मागील आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. झी टीव्हीवर गाजलेल्या बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेत दोघे एकत्र झळकले होते. त्याच काळात हे दोघे जवळ आहे. आत्तापर्यंत या दोघांनाही आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिली नव्हती. मात्र आता त्यांनी एकत्र महाआरती करुन अप्रत्यक्षरित्या आपल्या नात्याची कबुली दिली आहे. सध्या दिव्यांका स्टार प्लस वाहिनीवरील 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. तर शरद लवकरच सोनी टीव्हीवरील 'भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप' या मालिकेत महाराणा प्रतापच्या भूमिकेत दिसणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा शरद मल्होत्राच्या घरी झालेल्या महाआरतीची खास छायाचित्रे...