आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बालिका वधू\' फेम प्रत्यूषासोबत छेडछाड, घरात घुसून गैरवर्तन केल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालिका वधूमध्ये प्रत्यूषा बनर्जी (फाइल फोटो) - Divya Marathi
बालिका वधूमध्ये प्रत्यूषा बनर्जी (फाइल फोटो)
मुंबई- टीव्ही अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीच्या घरी काही लोक घुसले आणि स्वत:ला पोलिस एजेंट सांगून तिची छेड काढली. प्रत्यूषाने कांदिवली पोलिस ठाण्यात यांची तक्रार दाखल केली आहे.
प्रत्यूषासोबत कधी झाले गैरवर्तन-
- प्रत्यूषाच्या घरात घुसलेल्या 10 लोकांनी आधी तिचा बॉयफ्रेंड राहूल राज सिंहविषयी विचारले.
- जेव्हा अभिनेत्री म्हणाली, की राहूल घरी नाहीये तर तिची छेडछाड करण्यास सुरुवात केली.
- प्रत्यूषाच्या सांगण्यानुसार, सोमवारी संध्याकाळी (4 जानेवारी) सात वाजता या लोकांनी दाराला इतका जोरात धक्का मारला, की माझ्या चेह-याला आणि खांद्याला दुखापत झाली. नंतर मी 100 नंबरवर फोन केला आणि पोलिसांना बोलावले. फोन केल्यानंतर ते लोक पळून गेले.
- प्रत्यूषा 'बालिका वधू' मालिकेत आनंदीची भूमिका करतेय.
- याशिवाय ती 'बिग बॉस'ची स्पर्धकसुध्दा होती.
काय आहे प्रकरण?
- एशिअन एज वर्तमानपत्रानुसार, प्रत्यूषाचा बॉयफ्रेंड राहूनने कोटक महिंद्रा बँकेकडून कार लोन घेतले होते.
- तो याचा ईएमआय वेळेवर भरत नव्हता.
- तो अमित दळवी नावाच्या रिकव्हरी एजेंटच्या संपर्कात होता.
- राहूलने 31 डिसेंबरला दळवीला फोन करून सांगितले होते, की त्याने येऊन एक इंस्टॉलमेंट घेऊन जावे.
- त्या दिवशी दळवी राहूलच्या घरी पोहोचल्यानंतर राहूलने त्याला मारहाण केली.
- त्यानंतर राहूलच्या विरोधात रिकव्हरी एजेंट दळवीने कांदिवली पोलिस ठाण्यात 1 जानेवारीला तक्रार दाखल केली.
- या प्रकरणानंतर दळवी आपल्या साथीदारांसोबत प्रत्यूषाच्या घरी पोहोचला.
- प्रत्यूषाने सांगितले, की राहूल शहराबाहेर आहे. त्यानंतर दळवी निघून गेला.
- आरोप आहे, की दळवी आणि त्याचे साथीदार पुन्हा प्रत्यूषाच्या घरी पोहोचले.
- यावेळी त्यांनी पोलिसांसारखी वर्दी परिधान केलेली होती. राहूल घरी भेटला नाही म्हणून प्रत्यूषाची छेड काढली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्यूषाचा फोटो...
बातम्या आणखी आहेत...