आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shetty Kundra & Harman Baweja On Mad In India

'मॅड इन इंडिया'च्या सेटवर पोहोचले शिल्पा-हरमन, चुटकीसोबत केली धमाल-मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनील ग्रोवरचा 'मॅड इन इंडिया' या कॉमेडी शोच्या सेटवर शिल्पा शेट्टी कुंद्रा पोहोचली होती. शिल्पाने जरी बॉलिवूडमधून एक्झिट घेतली असली तरी तिचे ग्लॅमर आजही अनेक अभिनेत्रींवर भारी पडते. शिल्पासोबत अभिनेता हरमन बावेजासुध्दा होता. या दोन्ही स्टार्सनी 'मॅड इन इंडिया'च्या टीमसोबत बरीच धमाल-मस्ती केली.
मनीष पॉलने शोच्या शुटिंगदरम्यान शिल्पासोबत विनोदी स्वभावात फ्लर्टिंगही केले. त्याने तिला रंगेबेरंगी बेल्ट भेट म्हणून दिले आणि तिच्यासोबत 'तुम दिल की धडकन में...' गाण्यावर डान्ससुध्दा केला. दोघांनी लहान मुलांचा 'चिमणी उडाली...' हा खेळ खेळला. त्यामध्ये मनीष जिंकला.
यानंतर 'चुटकी'ने शिल्पाला फळ आणि कांदा खाण्यासाठी ऑफर केले. अभिनेता हरमन बावेजाने मनीषसोबत 'बिहार का बंगाली व्हर्जन' या गाण्यावर ठुमके लावले. एवढेच नाही तर, मनीषने हरमनकडून पुशअप करून घेतल्या. हरमनच्या 'ढिश्कियाऊ'वर 'मॅड इन इंडिया'च्या टीमने पोझ दिली. शोदरम्यान मनीष आणि शिल्पा क्रिकेटदेखील खेळले आणि यावेळी तिलाही सर्वांच्या आग्रहासाठी ठुमके लावाले लागले. 1 मिनीटांमध्ये 60 ठुमके लावण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. 'मॅड इन इंडिया' हा शो याच महिन्यात प्रसारित झाला आहे.
शिल्पा आणि हरमनसोबत 'मॅड इन इंडिया'च्या टीमने कशी केली धमाल-मस्ती, पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा PICS...