आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भाभीजी\' आहे 12वी पास, \'बिग बॉस\'च्या या स्पर्धकाला सेक्स चेंज करण्याची होती इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाभीजी अर्थात शिल्पा शिंदे आणि सब्यसाची सतपती. - Divya Marathi
भाभीजी अर्थात शिल्पा शिंदे आणि सब्यसाची सतपती.
मुंबई - बिग बॉस-11 मध्ये या विकेंडला ढिंचॅक पूजा एविक्ट झाली. ढिंचॅक पूजाला एविक्शनसाठी नॉमिनेट कंटेस्टंट सब्यसाची सतपती आणि बनाफशा सूनावाला यांच्या तुलनेच फार कमी व्होट मिळाले होते. त्यामुळे बिग बॉसमधील तिचा प्रवास रविवारी संपला. दरम्यान शोमध्ये प्रियंक शर्मा आणि आकाश ददलानी यांच्यात सुल्तानी अखाडा झाला. यामध्ये प्रियंक विजयी ठरला. तर, शोचा होस्ट सलमान खानने सर्व कंटेस्टंटला एक डर्टी सिक्रेट सांगण्याचा टास्क दिला होता. 
 
शिल्पा-हिनासह सर्व स्पर्धकांनी सांगितले डर्टी सिक्रेट 
- बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांनी एक-एक करत कॅमेरासमोर येऊन स्वतःबद्दलचे एक सिक्रेट सांगितले. 
- शिल्पा शिंदेने सांगितले, की ती 12वी पास आहे. तिने तिचे वडील (ते आज या जगात नाही) आणि कुटुंबियांना आजपर्यंत हे सत्य सांगितले नव्हते. ती त्यांना सांगायची की माझे ग्रॅज्यूएशन पूर्ण झाले आहे. आज नॅशनल टीव्ही वर हे आयुष्यातील मोठे गुपित उघड करत असल्याचे शिल्पा म्हणाली. 
- सब्यसाची सतपतीने या सिक्रेट रिव्हेल टास्कामध्ये आश्चर्यकारक खुलासा केला. त्याने सांगितले, की त्याचे एका मुलावर खूप प्रेम होते. त्याच्यासाठी सब्यसाची सेक्स चेंज करुन मुलगी होण्यासही तयार होता. 
- विकास गुप्ता म्हणाला, तो आई-वडिलांना वेगळे करणारा मुलगा आहे. जेव्हा आई आणि वडिलांचे आपसात जमत नव्हते तेव्हा त्याने एकदाही त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला नाही. ते घर सोडून गेले तेव्हा त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही. 

सपना चौधरीला व्हायचे होते पोलिस इन्स्पेक्टर 
- पोलिस इन्स्पेक्टर बनण्याचे  सपना चौधरीचे स्वप्न होते. वास्तविक तिने कधीही तिच्या आईला याबद्दल सांगितले नाही. ती लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले आणि तिने आईसोबत घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यामुळे तिचे स्वप्न, स्वप्नच राहिले. 
- हिनाने सांगितले की ती लहानपणी घरातून पळून गेली होती. जेव्हा पोलिसांच्या मदतीने ती घरी परत आली तेव्हा घरच्यांनी तिला बेदम चोपले होते. 
- अर्शी खानने सांगितले, की 2016 मध्ये क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबतचे लिंकअप आणि त्याच्या मुलाची आई होण्याच्या बातम्यांमध्ये जराही सत्यता नव्हती. तो फक्त एक विनोद होता. 
 
बंदगीने केली होती चोरी 
- बंदगीने सांगितले, की तिने एकदा वडिलांच्या पाकिटातून पैसे चोरले होते. 
- आकाशने त्याचे डर्टी सिक्रेट सांगितले, तो म्हणाला, मी एका स्पोर्ट्स
टुर्नामेंटमध्ये चीटिंग केली होती. 
- पुनीषने सांगितले, की बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी त्याच्या एका फ्रेंडने बंदगीचा फोटो व्हॉट्सअॅप डीपी ठेवला होता, तेव्हाच तो फोटो सेव्ह केला होता. बिग बॉसमध्ये आल्यानंतर बंदगीसोबत पहिली भेट झाली. 
- प्रियंकने सांगितले, की एका मोठ्या शोमधून त्याला काढून देण्यात आले होते, त्यामागे विकास गुप्ता होता. 
- या टास्कमध्ये बेनाफशाने तिच्या डिप्रेशनचा आजाराचे गुपित उघड केले. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बिग बॉस कंटेस्टंटचे जल्लादने केले व्हॅक्सिंग... 
बातम्या आणखी आहेत...