आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shinde, Famously Known As Angoori Bhabhi, Is Facing A Ban.

पुन्हा TVवर दिसणार नाही \'अंगूरी भाभी\', शिल्पा शिंदेवर लागणार लाइफटाइम बॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'भाभीजी घर पर है\' या टीव्ही मालिकेत अंगूरी भाभीचे पात्र साकारणारी शिल्पा शिंदे - Divya Marathi
\'भाभीजी घर पर है\' या टीव्ही मालिकेत अंगूरी भाभीचे पात्र साकारणारी शिल्पा शिंदे
'भाभीजी घर पर है' या टीव्ही मालिकेत अंगूरी भाभीचे पात्र साकारणारी शिल्पा शिंदे
मुंबई: 'भाभीजी घर पर है' या टीव्ही मालिकेत अंगूरी भाभीचे पात्र साकारणारी शिल्पा शिंदेला तुम्ही आता कधीच टीव्हीवर पाहू शकणार नाहीत, असे चित्र दिसतय. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन शिल्पावर लाइफटाइम बॅन लावण्याचा विचार करत आहेत. अर्ध्यातच मालिका सोडणे आणि अनप्रोफेशनल वागणूक केल्याने निर्माती बिनफेर कोहलीने शिल्पाच्या विरोधात तक्रार केली होती.
कपिल शर्माचा शोसुध्दा गेला हातातून...
- टीव्ही इंडस्ट्रीतील तज्ञांचे म्हणणे आहे, की CINTAAने लाइफटाइम बॅन लावल्यापूर्वीच शिल्पाच्या हातून कपिल शर्माचा शोसुध्दा गेला आहे.
- कपिलच्या नवीन शोमध्ये ती बुआ उपासना सिंहचे पात्र साकारणार होती.
- टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, CINTAAने शिल्पाच्या विरोधात एक नॉन-को-ऑपरेशन ऑर्डर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
- अर्थातच तिच्यासोबत कोणत्याही ब्रॉडकास्टर किंवा निर्मात्यांना काम करण्याची परवानगी नसेल.
- असोसिएशनने यापूर्वी शिल्पाला शोमद्ये परतण्यास सांगितले होते, मात्र तिने ऐकले नाही.
टीव्ही इंडस्ट्रीत पुन्हा जाणार नाही- शिल्पा शिंदे
- या प्रकरणात शिल्पासुध्दा माघार घेण्यास तयार नाहीये. एका लीडिंग वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने सांगितले, की ती शोच्या निर्मात्यांना आणि CINTAAला कोर्टात खेचणार आहे.
- सोबतच शिल्पाने असेही सांगितले, की आता ती कधीच टीव्ही इंडस्ट्रीत येणार नाही. त्यामुळे कुणीच तिच्यावर बॅन लावण्याची गरज नाहीये.
कसा सुरु झाला वाद?
- 'भाभीजी घर पर है' मालिकेची सुरुवात 2 मार्च 2015ला झाली होती. या शोमुळे शिल्पाला लोकप्रियता मिळाली.
- काही महिन्यांपासून तिचा शोचे निर्माते आणि टीमसोबत मानधनावरून वाद सुरु होता.
- शिल्पाचे मानधन दोनवेळा वाढवण्यात आले होते, अशाही बातम्या आल्या होत्या. तरीदेखील ती नाराज होती.
- शिल्पाला दुस-या चॅनल्ससोबत काम करायचे होते, मात्र तिला अडवण्यात येत होते.
शिल्पा म्हणाली होती चॅनल त्रास देतेय...
- एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले होते, की तिला चॅनल आणि प्रॉडक्शन हाऊस त्रास देत आहे.
- शिल्पा सांगते, 'मला चॅनल आणि प्रॉडक्शन हाऊस मानसिक रुपात त्रास देत आहेत.'
- त्यांनी मला धमकी दिली आहे, की जर मी दुस-या शोमध्ये आणि चॅनलसोबत काम केले तर ते माझे करिअर उध्वस्त करतील.
- मी कठिण काळात त्यांच्यासोबत राहिले. विचार केला होता, की तेही माझ्या कठिण काळात सोबत राहतील.
- मी मेडिकली अनफिट असल्याने शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली.
- मानधन वाढवण्याची मागणी मी केली होती, तो माझा अधिकार आहे. शोला एक वर्षे झाले आहे. म्हणून मानधन वाढवले पाहिजे.
- 'भाभीजी घर पर है'ची सुरुवात मागील वर्षी 2 मार्चला झाली होती. या शोमुळे शिल्पाला लोकप्रियता मिळाली.
काय म्हणाली होती निर्माती बेनिफेर...
- बेनिफेरने सांगितले, 'मानधन न वाढवणे, कस्ट्युम डिझाइनर उपलब्ध न करणे, मानसिक त्रासासारखे सर्व आरोप चुकीचे आहेत.'
- करारानुसार, 'तिच्या मानधनात दोन वर्षांत वाढ करायची होती. परंतु वर्षभरात तिचे मानधान दोनदा वाढवण्यात आले.'
- तिला एका चांगला कॉस्ट्युम डिझाइनर उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु तिने त्याला को-ऑपरेट केले नाही.
- एवढेच नव्हे, 'हे माझ्या कामाच्या हिशोबाने परफेक्ट नाहीत', असे म्हणून तिने 6-7 कॉस्ट्युम डिझाइनर्सना हाकलून लावले.
- ती शूज, ज्वेलरी आणि मेकअपसाठीसुध्दा पैसे मागत होती.
- तिने चॅनलकडून 20 लाखांपेक्षा जास्त पैसे घेतले आहेत. या अटीवरच तिने काम केले. स्पष्ट आहे, की तिने दुस-या चॅनलवर काम करणे आम्हाला कसे पटेल?
- ती आमच्या प्रसिद्ध मुख्य पात्रांपैकी एक आहे आणि तिचा अहंकार विनाकारण शोला भोगावा लागत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शिल्पी शिंदेचे काही PHOTOS...