आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shinde Was Earned 44 Thousand Per Episode By Bhabi Ji Ghar Par Hai!

एका एपिसोसाठी 44 हजार रुपये घ्यायची \'अंगुरी भाभी\', जाणून घ्या किती आहे TV स्टार्सची Fees

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्ही इंडस्ट्रीत 'अंगुरी भाभी' या नावाने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है' या मालिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शिल्पाने या मालिकेतून काढता पाय घेतल्यानंतर आता शुभांगी अत्रे मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारणार आहे. मानधन वाढवण्याच्या मागणीवरुन शिल्पा आणि या मालिकेच्या निर्मात्यांमध्ये वाद झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार शिल्पाने आपल्या मानधनात वाढ करुन मागितली होती, मात्र निर्मात्यांनी तिची ही मागणी फेटाळून लावली होती. तेव्हापासून शिल्पाने शूटिंगला जाणे बंद केले होते. शिल्पाला प्रति एपिसोड 44 हजार रुपये मिळत होते, ते वाढवून 80 हजार रुपये करावे, अशी मागणी शिल्पाने निर्मात्यांकडे केली होती.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, टीव्हीच्या आणखी काही प्रसिद्ध स्टार्सची किती आहे प्रति एपिसोड फी...