आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shocking Clauses In Agreement Of ‘Bigg Boss’ Contestants

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘Bigg Boss’मध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी स्पर्धकांना या अटी कराव्या लागतात मान्य, जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : 'बिग बॉस-8'चा होस्ट सलमान खान)
मुंबईः 'बिग बॉस-8'च्या घरात स्पर्धकांना केवळ कठीण टास्कलाच सामोरे जावे लागत नाही, तर येथे प्रवेश मिळवण्यासाठी अनेक अटीसुद्धा मान्य कराव्या लागतात. या अटी त्यांच्या करारात नमूद करण्यात आलेल्या असतात. या अटी जाणून नक्कीच तुम्हीही हैराण व्हाल. उदाहरणार्थ, एखाद्या स्पर्धकाने घरातील एखाद्या वस्तूचे नुकसान केल्यास त्याला 50 लाखांपर्यंत नुकसानभरपाई द्यावी लागू शकते. याशिवाय सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी एखादा स्पर्धक कुणालाही भडकवू शकतो.
या शोच्या काही माजी स्पर्धकांनी करारात नमूद करण्यात आलेले नियम आणि अटी dainikbhaskar.com सोबत शेअर केल्या आहेत. माजी स्पर्धकांनी कराराची कॉपी तर दाखवली नाही, मात्र सर्व नियम आणि अटी तोंडी सांगितल्या. त्या आम्ही तुम्हाला सांगत आहोत...
1.. हा शो स्क्रिप्टेड होता, असे शो संपल्यानंतर स्पर्धक म्हणू शकत नाही.
2.. बिग बॉसची निर्मिती प्रक्रिया स्पर्धक कुणासोबतही शेअर करु शकत नाही.
3.. एकदा घरात प्रवेश घेतल्यानंतर स्पर्धक घराबाहेर पडू शकत नाही. जर कुणी असे केले, तर त्याला एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागले.
4.. घरातील एखाद्या वस्तूचे नुकसान केल्यास, त्यासाठी 50 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी लागते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बिग बॉस 8'च्या घराची छायाचित्रे आणि सोबतच जाणून घ्या इतर अटी आणि नियम...