आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनीलच्या ‘मॅड इन इंडिया’ला मनीष पॉल ठोकणार रामराम, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मॅड इन इंडिया’ या शोचा सूत्रसंचालक मनीष पॉल या शोला रामराम ठोकणार अशी चर्चा गेल्या ब-याच दिवसांपासून रंगत होती. मात्र आता मनीष खरंच शोला अलविदा म्हणणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीषने अखेर ‘मॅड इन इंडिया’ हा शो सोडण्याचा निर्णय पक्का केला आहे. मनीषला खरं तर या शोकडून ब-याच अपेक्षा होत्या. मात्र हा शो त्याच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे त्याने शोपासून वेगळे होण्याचे ठरवले आहे.
जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी मनीषशी संपर्क साधला, तेव्हा तो म्हणाला, आता यावर मी काही बोलू इच्छित नाहीये. जे काही घडेल, ते लवकरच सर्वांना कळेल.
‘मॅड इन इंडिया’ हा शो सुनील ग्रोव्हरमुळे चर्चेत आला होता. सुनील कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोमध्ये गुत्थीचे पात्र साकारत होता. मात्र निर्माते आणि कपिलसोबत वाद झाल्याने सुनीलने हा शो सोडला आणि स्वतःचा शो ‘मॅड इन इंडिया’ या नावाने छोट्या पडद्यावर आणला. मात्र हा शो प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस पडला नाही. त्यामुळे मनीषने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या कोण आहे मनीष पॉल...