मुंबई- टीव्ही अभिनेत्री अर्शिमा थापरला अलीकडेच प्रॉडक्शन टीमच्या तीन सदस्यांनी सेटवर मारहाण केली. मात्र, याविषयी तिने स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, याची तक्रार सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट एसोसिएशन (CINTAA) आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉइजमध्ये (FWICE) दाखल करण्यात आली आहे. या संबंधित कडक कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मीडियामध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, 'अर्शिमाची तब्येत खराब होती. तरीदेखील तिला दुस-या दिवशी सकाळी लवकर रिपोर्ट करण्यास सांगितले. नकार दिल्यावर प्रॉडक्शन एग्झिक्युटीव्ह- अतुल चौहान (प्रॉडक्शन असिस्टंट), रणबीर सिंह चौहान (प्रॉडक्शन हेड) आणि आकर्ष शर्मा (सुपरव्हाइजिंग प्रॉड्युसर) यांच्यासोबत वाद झाला. ती सेट सोडून निघून गेली आणि काहीवेळाने सर्व प्रकार सोडवण्यासाठी पुन्हा परत आली. तेव्हा अतुलने तिचा हात पकडला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान अर्शिमाला मिर्गीचा झटका आला आणि ती थरथर कापायला लागली.'
काय म्हणाले, FWICEचे वरिष्ठ उपाध्यक्ष...
FWICEचे वरिष्ठ उपाध्यक्ष, संयुक्त सचिव आणि विवाद समितीचे अध्यक्ष अमित बहल यांच्या सांगण्यानुसार, 'जोपर्यंत यांच्या बॅन लागणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही केवळ शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषणाची बाब नाहीये. आम्ही महिलांच्या विरोधात होणा-या गुन्ह्यांची निंदा करतो.' यादरम्यान अर्शिमाचे वडील डॉक्टर वेद थापर यांनी मलवानी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
कोण आहे अर्शिमा थापर...
- अर्शिमाने 'ये है मोहब्बते' मालिकेत संजना अरोराची भूमिका साकारली आहे.
- 2011-2014मध्ये टेलिकास्ट झालेल्या 'बडे अच्छे लगते है' मालिकेत ती कॅडीच्या भूमिकेत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्शिमाचे निवडक फोटो...