आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shocking Revelations By The Former Lawyer Of Pratyusha's Boyfriend Rahul Raj Singh

राहुलच्या माजी वकिलांनी केले धक्कादायक खुलासे, सांगितले- का सोडली केस?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्युषा बॅनर्जी, राहुल राज सिंह आणि नीरज गुप्ता - Divya Marathi
प्रत्युषा बॅनर्जी, राहुल राज सिंह आणि नीरज गुप्ता
मुंबई: 'आनंदी' अर्थातच प्रत्युषा बॅनर्जीचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहच्या माजी वकिलाने त्याच्याविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. शुक्रवारी (8 एप्रिल) नीरज यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितले, की 31 मार्चच्या रात्री राहुल काय करत होता. त्यांनी असेही सांगितले, की अखेर का राहुलची केस सोडून दिला.
तरुणींना ड्रग्सची सवय लावायचा आणि धोका देऊन सोडून द्यायचा राहुल...
- नीरज गुप्ता यांना पत्रकार परिषदेत सांगितले, की 31 मार्चच्या रात्री राहुल बोरा बोरा रेस्तरॉमध्ये काही तरुणींसोबत पार्टी करत होता. ही पार्टी जवळपास 1:30 वाजेपर्यंत चालली.
- तो प्रत्युषासोबत नव्हता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी. राहुलच्या सांगण्यानुसार, तो चर्चमध्ये गेला होता. परंतु यात काहीही सत्य नाहीये.
- 1 एप्रिलला दुपारी प्रत्युषा गोरेगाव स्थित अपार्टमेटंमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली होती.
- नीरज यांनी यादरम्यान असेही सांगितले, की राहुल ड्रग्स अॅडिक्ट आहे. तो तरुणींना याची सवय लावतो. नंतर धोका देऊन सोडून देतो. हेच त्याने प्रत्युषासोबतसुध्दा केले.
- पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आत्महत्या ऐवजी प्लान मर्डर म्हणून करावा.
- नीरज यांच्या सांगण्यानुसार, या प्रकरणात सलोनी शर्माची (राहुलची कथित नवीन गर्लफ्रेंड) काय भूमिका आहे, याचीसुध्दा चौकशी करावी.
माजी वकिलाने उपस्थित केले प्रश्न...
- नीरज गुप्ता यांनी या प्रकरणाविषयी काही प्रश्न उपस्थित करून संकेत दिले आहेत, की राहुल प्रत्युषाचा गुन्हेगार असू शकतो.
- त्यांच्या सांगण्यानुसार, प्रत्युषा सकाळपासून मद्यपान करत होती, तर तिला इतके भान कसे राहिले, की पंख्याला फाशी घ्यावी?
- यापूर्वी प्रत्युषाची वकील फाल्गुनी ब्रह्मभटनेसुध्दा असे प्रश्न उपस्थित केले होते.
- फाल्गुनी म्हणाली होती, की राहुलने प्रत्युषाला पंख्याला लटकलेले पाहिले तर त्याने तिला खाली उतरवण्यासाठी पोलिसांना का बोलावले नाही.
- शिवाय, तो प्रत्युषाला घेऊन जवळच्या रुग्णालयात जाण्याऐवजी कोकिलाबेन रुग्णालयात का घेऊन गेला.
का सोडली राहुलची साथ?
- नीरज यांना विचारण्यात आले, की त्यांनी राहुलची साथ का सोडली? यावर ते म्हणाले, 'ते चांगले लोक नाहीत. राहुलचे वडील मला म्हणाले होते, की ती मुलगी तर गेली आता काय माझ्या मुलाला सरव्हाइव करावे लागेल? त्यांचा हा प्रश्न स्पष्ट सांगत होता, की त्यांना प्रत्युषाविषयी किती दु:ख आहे.'
- यादरम्यान नीरज यांनी राहुलच्या लग्नाविषयीसुध्दा बातचीत केली. त्यांनी राहुल आणि त्याची पत्नी सौगताचे काही फोटो दाखवले आणि सांगितले, की 2011मध्ये राहुलचे लग्न झाले होते. परंतु नीरज यांच्याकडे अद्याप घटस्फोटाचे काहीच पुरावे नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्युषाच्या मृत्यूनंतर बॉयफ्रेंड राहुलचे PHOTOS...