आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shocking: \'The Kapil Sharma Show\' Will End Soon.. Know Why?

लवकरच बंद पडणारेय कपिल शर्माचा नवीन शो, जाणून घ्या असे काय घडले?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्मा - Divya Marathi
कपिल शर्मा
मुंबईः कपिल शर्माचा नवीन शो 'द कपिल शर्मा शो' सुरु होऊन अद्याप आठवडासुद्धा झाला नाही आणि आता तो बंद पडणार असल्याची बातमी येऊन धडकली आहे. २३ एप्रिलपासून सुरु झालेला हा शो १३ आठवड्यात बंद पडणारेय.

पहिल्या सीझनमध्ये असतील २६ एपिसोडस्
एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कपिलने सांगितले, "जेव्हा आम्ही कॉमेडी नाइट्स विथ कपिल हा शो सुरु केला होता, तेव्हा आमची त्याची सीरिज सुरु करणार होतो. ज्याचे अनेक सीझन्स येणार होते. मात्र शो सुरु झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि तो शो आम्ही बंद केला नाही. मात्र नवीन शोच्या बाबतीत असे घडणार नाही. कारण आम्ही सर्वकाही आधीच निश्चित केले आहे. पहिल्या सीझनमध्ये एकुण २६ एपिसोड्स ऑन एअर होतील. हे एपिसोड्स १३ आठवडे चालतील. त्यानंतर आम्ही एक छोटा ब्रेक घेऊ आणि पुन्हा नवीन सीझनसोबत परतू. असे दुस-या सीझनच्या बाबतीतही असेल. त्यामुळे छोट्या छोट्या ब्रेकनंतर आम्ही परतणार आहोत."

कपिल शर्माच्या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये किंग खान शाहरुखने हजेरी लावली होती. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, फस्ट एपिसोडचे INSIDE PHOTOS...