आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कपिल शर्मा शो'च्या स्क्रिप्ट राइटरला खूनप्रकरणी अटक, गेल्या 7 वर्षांपासून होता फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'द कपिल शर्मा शो’चा पटकथाकार अभिषेक सिंह याला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 2009 साली झालेल्या हत्येप्रकरणी त्याला गुरुवारी अटक करण्यात आल्याचे कळते. उत्तर प्रदेशच्या आजमगढमधील मेहजान गावात अभिषेकचे आजोबा विभूती सिंह आणि गावचे सरपंच भूरे सिंह यांच्याशी वाद चालू होते. त्यावेळी अभिषेकच्या आजोबांवर झालेल्या हल्ल्यात त्यांचे प्राण वाचले. मात्र, रामनरेश शर्मा आणि रामेश्वर राम या दोन व्यक्तिंना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. याप्रकरणी पोलीस म्हणाले की, आम्ही अभिषेक उर्फ केरा सिंह याच्या काकाला (मनोज) अटक केली होती. पण गेल्या सात वर्षांपासून अभिषेक हा फरार होता. त्याच्यावर ३० हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आलेले.

काही दिवसांपूर्वी पोलिसांना अभिषेक हा वर्सोवा येथे रोहित सिंह या नावाने राहत असल्याचे कळले. त्यानंतर उत्तरप्रदेशातील पंकज सिंह, चंद्रप्रकाश आणि वरनाम सिंह हे तीन पोलीस अधिकारी त्याला पकडण्यासाठी मुंबईत आले. चौकशीदरम्यान अभिषेकने दिल्लीतून ‘मास कम्युनिकेशन’मध्ये पदवी घेऊन ‘एमबीए’देखील केल्याचे समोर आले. दरम्यान, केरा सिंह, रोहित सिंह, बलिंजर सिंह यांसारखी अनेक नावे बदलून अभिषेकने त्याची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने ‘ग्रेट इंडियन फॅमिली ड्रामा शो’ मध्येही अभिनय केला होता. याव्यतिरिक्त त्याने काही कार्यक्रमांच्या स्क्रिप्टही लिहल्या होत्या. त्याची पत्नी बँकॉक येथील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करते.

अभिषेकला गुरुवारी अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने त्याला चार दिवसांसाठी उत्तरप्रदेश पोलिसांकडे चौकशीसाठी सोपविले आहे.

पुढील स्लाईडमध्ये बङा, आरोपी राम अभिषेक सिंहचा फोटो...
बातम्या आणखी आहेत...