आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking! \'संजिवनी\' फेम अभिनेता संजित बेदीचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः टीव्ही इंडस्ट्रीतील नावाजलेला अभिनेता संजित बेदीचे मंगळवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून तो कोमात होता. ब्रेन व्हायरसने तो त्रस्त होता. उपचारादरम्यान मुंबईतील खासगी रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली. आज सकाळी अकरा वाजता मरीन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संजितच्या पश्चात त्याची पत्नी आहे. रेखा भाटिया हे त्याच्या पत्नीचे नाव आहे.
'संजीवनी' या गाजलेल्या मालिकेत डॉ. ओमीच्या भूमिकेतून संजित प्रसिद्धीझोतात आला होता. 'जाने क्या बात है', 'थोडी सी जमीन थोडासा आसमाँ', 'क्या होगा निम्मो का', 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमध्ये संचित झळकला होता. टीव्ही इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणून तो प्रसिद्ध होता. संजितच्या निधनाने अनेकांना धक्का बसलाय.
संजितच्या निधनाचे वृत्त मिळताच अनेक कलाकारांनी सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
पुढे वाचा, काय म्हणाले कलाकार...
बातम्या आणखी आहेत...