आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shooting Photos : Bhabi Ji Ghar Par Hain Fame Angoori Devi Turns Into A Kid

On Location: छोटी मुलगी बनली टीव्हीची 'अंगुरी भाभी', असे झाले स्पेशल एपिसोड्सचे शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शूटिंग करताना रोहिताश गौड, शिल्पा शिंदे आणि सोमा राठौर - Divya Marathi
शूटिंग करताना रोहिताश गौड, शिल्पा शिंदे आणि सोमा राठौर

मुंबईः आगामी एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना भाभीजींचा हटके अंदाज बघायला मिळणार आहे. आम्ही बोलतोय ते टीव्ही शो 'भाभीजी घर पर है' या मालिकेविषयी. या मालिकेत अंगुरी भाभी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे अलीकडेच सेटवर दोन वेण्यात दिसली. तिच्या हातात एक बेबी डॉलसुद्धा दिसली. सध्या या मालिकेची संपूर्ण टीम दिवाळी स्पेशल सिक्वेन्सचे शूटिंग करत असून या एपिसोड्समध्ये अंगुरी भाभी लहान मुलगी बनते.
divyamarathi.com सोबत बोलताना शिल्पाने सांगितले, "अंगुरीला फटाक्यांची भीती वाटते. दीवाळीत फटाक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ती लहान मुलीचे सोंग घेते. आशा आहे, की माझा हा चाइल्डिश अॅक्ट प्रेक्षकांना पसंत पडेल. शूटिंग करताना मी खूप एन्जॉय करतेय."
'भाभीजी घर पर हैं' ही मालिका दोन शेजा-यांच्या नोंकझोंकवर आधारित आहे. अँड टीव्हीच्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'भाभीजी घर पर है' या मालिकेच्या स्पेशल एपिसोड्सच्या शूटिंगचे निवडक फोटोज...
सर्व फोटोः अजीत रेडेकर