आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: प्रमोशनसाठी श्रध्दाने गायले गाणे, हनी सिंगच्या रॅपवर केला Dance

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री श्रध्दा कपूर)
मुंबई: अभिनेत्री श्रध्दा कपूर तिच्या 'हैदर' आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती बुधवारी (24 सप्टेंबर) हनी सिंगच्या 'इंडियाज रॉ स्टार' शोच्या सेटवर पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत सिनेमाचा हिरो शाहिद कपूर दिसला नाही. परंतु सिनेमा दिग्दर्शक विशाल भारद्वाज आले होते.
'इंडियाज रॉ स्टार'च्या सेटवर श्रध्दा मोनोक्रोमा लेक ब्लॅक अँकल स्ट्रिप ड्रेसमध्ये दिसली. त्याच्यासह तिने लूकला कम्पलिट करण्यासाठी ब्लॅक सँडल, हातात घड्याळ आणि लिपस्टिक लावलेली होती. श्रध्दाची हेअरस्टाइलसुध्दा तिला शोभून दिसत होती. इव्हेंटमध्ये यो यो हनी सिंगसोबत ती परिक्षक बनून बसली होती. शोमध्ये श्रध्दाने एक गाणेसुध्दा गायले. त्यावर हनी सिंग थिरकताना दिसला. शोची होस्ट गौहर खानदेखील स्टाइलिश लूकमध्ये दिसून आली.
हा सिनेमा व्हिलियम्स शेक्सपिअरच्या 'हेमलेट' कादंबरीवर आधारित आहे. सिनेमाचे शूटिंग जम्मू आणि काश्मिरमध्ये झाले आहे. विशाल भारद्वाजने दिग्दर्शित केला असून संगीतही दिला आहे. 2 ऑक्टोबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या श्रध्दाची खास छायाचित्रे...