आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'तिवारी'ला सोडून 'विभूती'सोबत अमेरिकेत एन्जॉय करतेय 'अंगुरी भाभी', बघा PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क सिटीत शुभांगी अत्रे आणि आसिफ शेख, इनसेटमध्ये अभिनेता रोहिताश गौड - Divya Marathi
न्यूयॉर्क सिटीत शुभांगी अत्रे आणि आसिफ शेख, इनसेटमध्ये अभिनेता रोहिताश गौड
मुंबईः अँड टीव्हीवरील गाजत असलेल्या 'भाभीजी घर पर है' या मालिकेची टीम स्वांतत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आहे. यावेळी मालिकेत नेहमी ट्रेडिशनल साडीत दिसणारी अंगुरी भाभी अर्थातच अभिनेत्री शुभांगी अत्रे टाइम्स स्क्वेअरवर वेस्टर्न स्टाइलमध्ये दिसली. इतकेच नाही तर येथे अंगुरी भाभीने विभूती नारायण मिश्रा अर्थातच अभिनेता आसिफ शेखसोबत लंचसुद्धा केले. यावेळी मालिकेतील गोरी मेम अर्थात अनिता भाभी (सौम्या टंडन) सुद्धा विभूती आणि अंगुरीसोबत आहे.
तिवारीजींना मिळाला नाही वीजा...
मनमोहन तिवारी (अभिनेता रोहिताश गौड) यांना वीजा न मिळाल्याने ते न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. संपूर्ण टीममध्ये केवळ रोहिताश गौड यांचाच वीजा रिजेक्ट झाले होता.
अंगुरी भाभीने केली भरपूर शॉपिंग...
पहिल्यांदाच यूएस ट्रिपवर गेलेल्या 'अंगुरी भाभी' (शुभांगी अत्रे)ने न्यूयॉर्कच्या मॅनहट्टन परिसरात भरपूर शॉपिंग केले. अँड टीव्हीवर प्रसारित होणारी ही मालिका भारताबाहेरसुद्धा लोकप्रिय झाली आहे. टीव्ही होस्ट मनीष पॉलसुद्धा याकाळात न्यूयॉर्कमध्येच आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, अमेरिकेत क्लिक झालेली 'अंगुरी भाभी'ची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...