आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shubhangi Atre Will Now Be Seen Playing Angoori On Screen

'अंगुरी भाभी'चा शोध लागला, शिल्पाच्या जागी आता झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा शिंदे आणि शुभांगी अत्रे - Divya Marathi
शिल्पा शिंदे आणि शुभांगी अत्रे

मुंबईः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'भाभीजी घर पर है' या मालिकेत आता शिल्पा शिंदेच्या जागी कोणती अभिनेत्री झळकणार याचा उलगडा अखेर झाला आहे. अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी आता शुभांगी अत्रे या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. काही दिवसांपासून शिल्पा शिंदे आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये सुरु असलेला वाद गाजतोय. शिल्पाने अचानक या मालिकेतून काढता पाय घेतला होता. त्यानंतर शिल्पाला टीव्ही इंडस्ट्रीत बॅन करण्यात येणार असल्याचेही वृत्त गाजले होते. हा वाद सुरु असताना निर्माते दुस-या अभिनेत्रीच्या शोधात होते. या भूमिकेसाठी रश्मी देसाईचेही नाव पुढे आले होते. मात्र आता शुभांगी अत्रेच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शुभांगी आता 'सही पकडे है...' म्हणत अंगुरी भाभीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. शुभांगीने कसौटी जिंदगी की, कस्तुरी, दो हंसो का जोडा, अधुरी कहानी हमारी यांसारख्या मालिकांमधून अभिनय केला आहे.
दुस-यांदा शिल्पाला केले रिप्लेस
आश्चर्याची बाब म्हणजे शुभांगीने पहिल्यांदाच शिल्पाला एखाद्या मालिकेत रिप्लेस केले, असे मुळीच नाहीये. यापूर्वी 'चिडिया घर' या मालिकेत कोयलच्या भूमिका शिल्पा शिंदे साकारत होती. मात्र शिल्पाने मालिका नाकारल्यानंतर ही भूमिका शुभांगीला मिळाली होती. आता दुस-यांदा शुभांगी शिल्पाला रिप्लेस करत आहे.
पुढे वाचा, शिल्पा शिंदे आणि निर्मात्यांमध्ये कशावरुन निर्माण झाला होता वाद...