आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तान्ह्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग करताना दिसली ही मराठमोळी अॅक्ट्रेस, स्वतः शेअर केला PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अॅक्ट्रेस श्वेता साळवेने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून ती फोटोत तिची तान्ही मुलगी आर्याला ब्रेस्ट फीडिंग करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करुन श्वेताने लिहिले, "My Sanctum My Haven". सध्या श्वेता तिचे फेवरेट डेस्टिनेशन गोव्यात आहे. येथे ती तिचा नवरा हेमंत सेठी आणि मुलगी आर्यासोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. ऑगस्ट महिन्यात दिला मुलीला जन्म
श्वेता साळवे मराठी असून हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत आहे. 'एक था चंदर, एक थी सुधा', 'कहीं किसी रोज', 'किटी पार्टी', 'लेफ्ट राइट लेफ्ट या हिंदी मालिकांमध्ये श्वेता झळकली आहे. याशिवाय 'खतरों के खिलाडी 2', 'झलक दिखला जा 1' या रिअॅलिटी शोजमध्येही ती सहभागी झाली होती. एप्रिल 2012 मध्ये श्वेताने तिचा बॉयफ्रेंड हेमंत सेठीसोबत लग्न केले. हेमंत व्यवसायाने बिझनेसमन आहे. टीव्ही शोजव्यतिरिक्त श्वेताने 'दिल तो बच्चा है जी' (2011) आणि 'लंका' (2011) या सिनेमांमध्ये आयटम नंबर केलाय. इतकेच नाही तर तिने 'प्यार में कभी कभी' (1999), 'ना घर के ना घाट के' (2010), 'कुरुक्षेत्र' (2013) आणि 'राम लीला' (2013) या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, मुलगी आर्या आणि नव-यासोबतचे श्वेताचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...