आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद होणार चंद्र नंदिनी, लास्ट एपिसोडमध्ये इमोशनल झालेल्या TV अॅक्ट्रेसने लिहिले हे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रजत टोकस, एकता कपूर आणि श्वेता बसु प्रसाद. - Divya Marathi
रजत टोकस, एकता कपूर आणि श्वेता बसु प्रसाद.
मुंबई - स्टार प्लसचा पॉप्यूलर टीव्ही शो 'चंद्र नंदिनी'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. हा शो लवकरच बंद होणार आहे. या शोची जागा नवा शो 'इक्यावन' घेण्याची शक्यता आहे. यामध्ये प्राची टेहलन आणि नमिस तनेजा असतील. काही दिवसांपूर्वीच चंद्र नंदिनीचा रॅप-अप (शेवटचा एपिसोड) शूट करण्यात आला. त्यानंतर शोमध्ये महाराणीच्या भूमिकेत असलेली अॅक्ट्रेस श्वेता बसू प्रसाद हिने एक इमोशनल नोट सोशल मीडियावर शेअर केली. त्यात लिहिले होते, 'प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो, त्यामुळे चंद्र नंदिनीचाही शेवटचा प्रवास आहे. यावेळी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही.'
 
- श्वेताने शोची प्रोड्यूसर एकता कपूरला धन्यवाद देताना लिहिले, मला हा सुंदर अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद. चंद्र नंदिनीच्या संपूर्ण कास्ट आणि क्रू मेंबर्सला धन्यवाद. 
- त्यासोबत क्रिएटिव्ह टीम, डायरेक्टर्स, को-अॅक्टर्स, मेकअप मॅन, हेअर स्टायलिस्ट, कॅमेरा आणि प्रोडक्शन टीम या सर्वांचे श्वेताना आभार मानले. कुटुंब आणि मित्र यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दलही श्वेताना त्यांना धन्यवाद दिले. 
 
टीमने ढाब्यावर केली पार्टी 
- शूटच्या शेवटच्या दिवशी चंद्र नंदिनीची पूर्ण टीम किनारा ढाबा येथे गेली होती. येथे त्यांनी पार्टी केली. येथे चेतन हंसराज, सिद्धार्थ निगम आणि श्वेता बसू प्रसादसह संपूर्ण टीम आणि क्रू मेंबर्स होते. 
 
10 ऑक्टोबर 2016 ला सुरु झाला होता शो 
- चंद्र नंदिनी हा शो 10 ऑक्टोबर 2016 ला  ऑन एअर गेला होता. जवळपास 1 वर्ष हा शो चालला होता. यात रजत टोकस याने चंद्रगुप्त मौर्य ची भूमिका केली होती. तर श्वेता राणी नंदिनीच्या भूमिकेत होती. याशिवाय तनु खान, सिद्धार्थ निगम, अर्पित रांका, चेतन हंसराज आणि अवनीत कौर महत्त्वाच्या भूमिकेत होते. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा आणखी फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...