आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेता तिवारीने वैष्णोदेवी मंदिरात साजरा केला मुलाचा 1st B\'Day, शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा रेयांशसोबत श्वेता. - Divya Marathi
मुलगा रेयांशसोबत श्वेता.

मुंबई - टीव्ही अॅक्ट्रेस श्वेता तिवारीने नुकताच मुलगा रेयांश कोहलीचा पहिला बर्थडे साजरा केला. एकीकडे सेलेब्स तारांकित हॉटेल आणि वॉटर पार्कसारख्या ठिकाणी मुलांचे वाढदिवस साजरे करत आहेत, त्यात श्वेताने मुलगा रेयांशचा पहिला वाढदिवस वैष्णोदेवीचा दरबार कटरा येथे सेलिब्रेट केला. यावेळी श्वेताची 17वर्षांची मुलगी पलक देखील तिच्यासोबत होती. दोघा बहिण भावांमध्ये 16 वर्षांचे अंतर आहे. 

 

सोशल मीडियावर शेअर केले फोटो.... 
श्वेता तिवारीने मुलाच्या वाढदिवसाचे आणि वैष्णोदेवी ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये दोन्ही मुलांसह ती एंजॉय करताना दिसली. 27 नोव्हेंबरला रेयांश 1 वर्षांचा झाला. मुलासोबतचा फोटो शेअर करताना श्वेताने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले, 'तुझ्या शिवाय माझे आयुष्य पूर्ण होत नाही.' अतिशय ह्रदयस्पर्षी संदेशात श्वेता म्हणाली, "Reyansh, my life felt absolutely idyllic and complete until you came along. Because it was only after you that I realised how much I craved you and how much my life craved you. I've always found it amusing how such a small baby can fill out such enormous places in a family's household. You've become our life Reyansh." 

 

मुलगा आणि मुलीत यामुळे आहे 16 वर्षांचे अंतर... 
- रेयांश आणि पलक हे श्वेताची दोन मुलं आहेत. यांच्यामध्ये जवळपास 16 वर्षांचे अंतर आहे. श्वेताचा पहिला पती राजा चौधरीपासून तिला एक मुलगी आहे. तिचे नाव पलक असून ती आता 17 वर्षांची आहे. श्वेता आणि राजाचे लग्न 1988 मध्ये झाले होते. 2007 मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला होता. त्यानंतर श्वेताना अॅक्टर आणि बिझनेसमॅन अभिनव कोहलीसोबत 2013 मध्ये दुसरे लग्न केले. या जोडप्याला आता रेयांश हा मुलगा झाला आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा... श्वेताचे मुलगा आणि मुलीसोबत 7 Photos

बातम्या आणखी आहेत...