दुसऱ्यांदा आई बनणार असलेली अॅक्ट्रेस श्वेता तिवारीने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात श्वेता तिच्या मित्रांबरोबर चिल करत असल्याचे पाहायला मिळाले. श्वेताला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. पलक असे तिचे नाव पलकनेच श्वेताला दुसऱ्या लग्नासाठी तयार केले होते.
श्वेताच्या दुसऱ्या लग्नात मनसोक्त नाचली होती पलक
श्वेताच्या दुसऱ्या लग्नाच्या संगीत सेरेमनीदरम्यान पलकने जोरदार डान्स केला होता. श्वेताने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या आयुष्यात तिने अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला आहे. त्याच पलकलाही मोठा त्रास झाला. आर्थिक चनचन असल्याने श्वेता कामात बिझी राहायची. त्यामुळे पलकला ती वेळ देऊ शकली नाही. पण आता मुलीला पूर्ण वेळ द्यायचा असे श्वेताने ठरवले आहे.
2010 पासून अभिनवला करत होती डेट
2010 पासून श्वेता अॅक्टर अभिनव कोहलीला डेट करत होती. 2013 मध्ये एका रियालिटी शोमध्ये तिने लग्नाची घोषणा केली होती. 13 जुलै 2013 रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तिचा दुसरा विवाह झाला होता. 2007 मध्ये तिचा राजा चौधरीबरोबर घटस्फोट झाला होता. 'कसौटी जिंदगी की', 'परवरिश : कुछ खट्टी कुछ मीठी' अशा शोमध्ये झळकलेली श्वेता 'बेगूसराय' मध्येही होती. याच तिने नकारात्मक भूमिका साकारली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, श्वेता आणि अभिनव यांच्या मेहंदी संगीत, लग्न आणि रिसेप्शनचे Photos
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.