आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेता तिवारीची कार्बन कॉपी आहे मुलगी पलक, शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी दिसायला एकदम श्वेतासारखीच आहे. श्वेताने नुकतेच मुलगी पलकबरोबर काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यात ती एकदम श्वेतासारखी दिसत आहे. पलक ही श्वेताचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. 2007 साली श्वेताने राजासोबत तिचे 9 वर्षाचे नाते संपुष्टात आणले होते. 21 व्या वर्षी आई बनली होती श्वेता तिवारी..
 
श्वेता तिवारीने केवळ 21 वर्षाची असताना पलकला जन्म दिला होता. यानंतर 2007 साली श्वेताने पती राजा चौधरीसोबत घटस्फोट घेतला आणि 13 जुलै 2013 साली अभिनेका अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले. अभिनव आणि श्वेता यांचा एक मुलगा आहे त्याचे नाव रेयांश आहे.
 
श्वेताच्या दुसऱ्या लग्नात मनसोक्त नाचली होती पलक..
श्वेताच्या दुसऱ्या लग्नात पलकने मनसोक्त डान्स केला होता. श्वेताने एका मुलाखतीत सांगितले की, तिने तिच्या आयुष्यात खूप खराब वेळेचा सामना केला आहे. पण या सर्वाचा त्रास तिच्या मुलीला जास्त सहन करावा लागला. तिला लहानपणी खूप कमी वेळ देण्याची खंत असल्याचे श्वेताने सांगितले. 
 
नुकतेच टीव्ही शो बेगुसराय मध्ये दिसली श्वेता..
'कसौटी जिंदगी की', 'परवरिश : कुछ खट्टी कुछ मीठी' यांसारख्या शोमध्ये काम केलेली अभिनेत्री श्वेता तिवारी बेगूसराय या मालिकेत दिसली होती. यात श्वेताने नकारात्मक भूमिका केली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, श्वेता तिवारीचे पलकसोबतचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...