आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-यांदा आई होणारेय अभिनेत्री श्वेता तिवारी, 15 वर्षांच्या मुलीची आहे आई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी पलकसोबत श्वेता तिवारी - Divya Marathi
मुलगी पलकसोबत श्वेता तिवारी
मुंबईः टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी प्रेग्नेंट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबर महिन्यात श्वेता आपल्या बाळाला जन्म देणारेय. श्वेता 21 वर्षांची असताना पहिल्यांदा आई झाली होती. पहिला नवरा राजा चौधरीपासून श्वेताला 15 वर्षांची एक मुलगी असून तिचे नाव पलक आहे.

2013 मध्ये केले दुसरे लग्न...
2007 साली श्वेताने राजा चौधरीसोबत घटस्फोट घेऊन पहिले लग्न संपुष्टात आणले. घटस्फोटानंतर जवळजवळ सहा वर्षांनी श्वेताने अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले. लग्नापूर्वी तीन वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

'बेगुसराय'मध्ये झळकली श्वेता...
श्वेताला 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. तिने 'नागिन', 'सजन रे झूठ मत बोलो', 'परवरिश आणि 'बालवीर' या मालिकांमध्ये काम केले. श्वेता शेवटची बेगुसराय या मालिकेत झळकली होती.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, श्वेताची मुलगी आणि दुसरा पती अभिनवसोबतची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...