आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shweta Tiwari Wants To Spend More Time With Daughter Now

आता 13 वर्षांची मुलगी पलकला पुरेसा वेळ देण्याची श्वेता तिवारीची इच्छा, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी पलकसह श्वेता तिवारी. हे छायाचित्र श्वेता तिवारीच्या फेसबुक अकाउंटवरून घेण्यात आले आहे.
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी पहिल्यांदाच 'बाल वीर' या शोमध्ये नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. तिच्यासाठी हे आव्हानात्मक तर आहेच, मात्र गंमतीशीर पात्र आहे. ब-याच दिवसांनंतर श्वेता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अवतरत आहे. तेही एक वेगळी भूमिका घेऊन.
श्वेता तिवारी टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री आहे. परंतु ती करिअरपेक्षा खासगी आयुष्यासाठी जास्त ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीत सांगितले होते, की ती आयुष्यात अनेक समस्यांना सामोरी गेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक त्रास तिच्या मुलीला झाला आहे. बालपणी ती मुलीला पुरेसा वेळ देऊ शकली नाही. अर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने श्वेता सतत कामात असायची. मुलीकडे लक्ष देण्यासाठी तिला वेळ मिळत नसे. पण आता तिला 13 वर्षांची पलक हिच्याकडे लक्ष द्यायचे आहे. तिच्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा आहे.
राजा चौधरीपासून घेतला घटस्फोट
श्वेता तिवारी आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांच्यातील वाद अनेकदा चर्चेचा विषय व्हायचा. श्वेताने त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक रुपात त्रास दिल्याचा आरोप लावून घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. 2007मध्ये दोघांनी कायदेशिरित्या 9 वर्षांचे जूने नाते संपुष्टात आणले.
अभिनव कोहलीशी केले दुसरे लग्न
राजा चौधरीपासून घटस्फोट घेतल्यानंतर खासगी आयुष्यात वाईट परिस्थितीत जगणा-या श्वेताने अभिनेता अभिनव कोहलीसह 13 जुलै 2013 रोजी दुसरे लग्न केले.
'बिग बॉस' पहिली फिमेल विनर
श्वेता तिवारीने एकता कपूरची 'कसौटी जिंदगी की' या मालिकापासून लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तिने अनेक शो, मालिकांमध्ये काम केले. परंतु 2011मध्ये 'बिग बॉस'च्या चौथ्या पर्वाची विजेती ठरून श्वेता पुन्हा एकदा चर्चेत आली. ती या शोची पहिली फिमेल विनर ठरली. त्यानंतर जुहू परमार, उर्वशी ढोलकिया आणि गौहर खान यांनी या विजेत्या ठरल्या.
श्वेता तिवारीचे शो:
कसौटी जिंदगी की (2001-08), नच बलिये-2 (2006), जाने क्या बात हुई (2009-09), इस जंगल से मुझे बचाओ (2009), बिग बॉस सीजन-4 (2010-11), सजन रे झूठ मत बोलो (2011), 'कॉमेडी सर्कस का नया दौर' (होस्ट, 2011), रंगोली (होस्ट, 2012), परवरिश (2011-13), झलक दिखला जा सीजन-6 (2013), बाल वीर (2014)

श्वेता तिवारी आणि तिच्या फॅमिलीची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...