आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कसौटी जिंदगी'च्या अभिनेत्याने रशियन गर्लफ्रेंडसोबत थाटले दुसरे लग्न, 12 वर्षीय मुलीचा आहे बाप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण करणारा अभिनेता आनंद सूर्यवंशी उर्फ सिद्धार्थ सूर्यवंशी 23 नोव्हेंबर रोजी रशियन गर्लफ्रेंड अलेसिया राऊतसोबत विवाहबंधनात अडकला. या कपलचे वेडिंग फोटोज समोर आले आहेत. लग्नात आनंदने ब्लू कलरची शेरवानी तर अलेसियाने पिंक अँड ब्लू कलरचा गोल्डन वर्क असलेला लहेंगा परिधान केला होता. लग्नात दोघे लिपलॉक करताना दिसले.  


लग्नात थिरकला आनंद...
- लग्नाच्या फोटोजमध्ये आनंद डान्स करताना दिसतोय.
- आनंदने एक व्हिडिओेदेखील शेअर केला असून यामध्ये तो ढोलच्या तालावर थिरकताना दिसतोय.
- गेल्याच वर्षी आनंदने काही कारणास्तव स्वतःचे नाव बदलून सिद्धार्थ सूर्यवंशी केले. 

12 वर्षांच्या मुलीचा वडील आहे आनंद...
- आनंदला एक 12 वर्षांची मुलगी आहे. त्याचे पहिले लग्न फार काळ टिकू शकले नाही.
- तर अलेसियाविषयी सांगायचे म्हणजे, ती सुद्धा एक सिंगल मदर असून पहिल्या लग्नापासून तिला 10 वर्षांचा मुलगा आहे. 
- अलीकडेच एका लीडिंग वेबसाइटसोबत बोलताना आनंदने सांगितले, "माझी मुलगी या लग्नामुळे खूप आनंदी आहे. ती आमच्या संगीत सेरेमनीत परफॉर्म करणार आहे. लग्नासाठी तिने शाळेतून सुटी घेतली आहे."

 

या शोजमध्ये झळकला आहे आनंद..
- आनंद ब-याच कालावधीपासून टीव्ही इंडस्ट्रीत अॅक्टिव आहे.
- तो आतापर्यंत ममता(2006), जमीन से आसमान तक(2004), विरूद्ध(2007), भाग्यविधाता(2009), ये इश्क हाय(2010), हमने ली है शपथ(2012), सूर्यपुत्र कर्ण(2015), वारिस(2016) या शोजमध्ये झळकला आहे.

 

सुपरमॉडेल आहे अलेसिया...
- भारतीय वडील आणि रशियन आईची मुलगी असलेली अलेसिया प्रसिद्ध सुपर मॉडेल, वीजे आणि फॅशन कोरिओग्राफर आहे. 
- अलेसियाने अनेक फॅशन शोजमध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचे डिझाइन्स रिप्रजेंट केले आहेत. याशिवाय ती फेमिना मिस इंडिया आणि मिस इंडिया यूनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाली होती. सोबतच ती 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी' सीझन-4 मध्येही झळकली होती.
- अलेसियाचे पहिले लग्न रशियन इकॉनॉमिस्टसोबत झाले होते. पण फार काळ त्यांचे लग्न टिकले नव्हते.


पुढील स्लाईड्सवर बघा, आनंद आणि अलेसिया यांचे लग्नाचे खास PHOTOS.. 

बातम्या आणखी आहेत...