आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षांपासून सुरू असेलेला शो 'तारक मेहता..'वादात, होत आहे बंद करण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 9 वर्षांपासून सुरू असलेला प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' वादात अडकला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने या शोवर बॅन लावण्याची मागणी केली आहे. समितीने शोमधील कंटेंटमुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शो ऑफएअर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

कशामुळे केली बंदीची मागणी.. 
- काही दिवसांपूर्वी शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या जीवनातील काही भाग शोमध्ये दाखवण्यात आला. त्यावरून शीख समुदायामध्ये नाराजी आहे.  शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रमुक कृपाल सिंह यांची मिडियाशी बोलताना सांगितले की, कोणालाही गुरू गोविंद सिंग यांच्याशी तुलना करण्याची परवानगी नाही. कोणत्याही अॅक्टर किंवा कॅरेक्टरला ही परवानगी नाही. हा प्रकार आम्ही कधीही सहन करणार नाही. 

शोच्या डायरेक्टर आणि चॅनलला दिला इशारा 
- कृपाल सिंह यांनी 'तारक मेहता..' शो बंद करण्याच्या मागणीबरोबर डायरेक्टर आणि चॅनलला इशाराही दिला आहे. आगामी काळात पुन्हा असा कंटेंट न दाखवण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

जुलै 2008 मध्ये सुरू झाला होता शो.. 
 
बातम्या आणखी आहेत...