(बॉलिवूड गायक अली कुली मिर्जा)
मुंबईः '
बिग बॉस'च्या घरात लवकरच एका नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. मिळालेल्या बातमीनुसार, वाइल्ड कार्डच्या माध्यमातून गायक अली कुली मिर्जाची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री होणार आहे. 'ब्लफमास्टर' या सिनेमातील 'बुरे बुरे हम शैतान' या गाण्यासाठी अली कुली मिर्जा ओळखला जातो.
अली कुली मिर्जाला बॉलिवूडमध्ये गायक आणि अभिनेत्याच्या रुपात ओळखले जाते.
अभिषेक बच्चन आणि
प्रियांका चोप्रा स्टारर 'ब्लफमास्टर' या सिनेमातील अलीने गायलेले 'बुरे बुरे' हे गाणे बरेच गाजले होते. अलीचा लवकरच 'रोर: टाइगर्स ऑफ सुन्दर वन' हा सिनेमा रिलीज होणार आहे. आता अलीच्या आगमनामुळे 'बिग बॉस'च्या घरात कोणते नवीन ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अलीची छायाचित्रे...