आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डान्सर सपनाच्या LIFE चे हे आहे सिक्रेट, गुरुने सांगितली पडद्यामागची कहानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सपना चौधरी. - Divya Marathi
सपना चौधरी.

मुंबई/मुंढाल - लोकगीत गायक वीरपाल सिंह खरकिया त्यांच्या गाण्यातून आणि खास अंदाजात उत्तर भारतात 'मुली वाचवा' हा संदेश देत असतात. त्यांचे लोकगीत 'फर्क नहीं बेटा बेटी मै, मत ना तुम इंसान करो…' हे गाणे ऐकताना प्रेक्षकांचे डोळे भरुन येतात. सपनाची 'सपना चौधरी' होण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. एखाद्या हिऱ्याला बरोबर कोंदणात बसवावे तसे वीरपाल सिंह यांनी सपनाच्या आवाजाला पैलू पाडले. DivyaMarathi.com च्या पडताळणीत हेही समजले की कसे दिल्लीची (यूपी) सपना हरियाणवी झाली. 

 

7 वर्षांपूर्वी सपनाची झाली गुरुसोबत भेट 
- दिल्लीला जन्मलेल्या सपना चौधरीचे वडील उत्तर प्रदेशातील होते. वडिलांच्या मृत्यूनंतर तिन भावंडात सपना सर्वात मोठी होती. त्यामुळे सहाजिकच वडिलांच्या नंतर घराची जबाबदारी तिच्या कोवळ्या खांद्यावर आली. फक्त 10 वी पास मुलगी अखेर घर कसे चालवणार. 
- लहानपणापासून सपनाला हरियाणवी संस्कृतीबद्दल आपलेपणा होता. सपना नेहमी हरियाणवी रागिनी (लोकगीत) एकत असायची. 2010 मध्ये तिची भेट खरक कलां गावच्या वरीपालसिंह यांच्यासोबत झाली. 
- वीरपाल यांनी सपनाची आर्थिक परिस्थिती पाहिली त्यासोबतच हरियाणाच्या संगीताबद्दलचे तेच प्रेम आणि समज कळाल्यानंतर त्यांनी तिला हरियाणाचा साज ढोलक, तबला, हार्मोनियम आणि कलाट यांचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. 
- वीरपाल आणि सपना यांच्या पहिला लाइव्ह प्रोग्राम पुंडरी येथे 21 डिसेंबर 2010 ला झाला होता. येथूनच सपनाच्या हरियाणवी रागिनी गायकीला सुरुवात झाली, आणि दिल्ली (यूपी)ची सपना चौधरी हरियाणवी होण्याचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर सपना सर्वांच्या परिचयाची झाली. 
- बिग बॉसच्या एंट्रीवेळी ' रै छोरी तू सै बड़ी बिंदास…' या गाण्यावर सपना चौधरीची धमाकेदार एंट्री झाली होती. त्याच बरोबर शोचा होस्ट सलमान खानही या गाण्यावर थिरकला होता. 

हरियाणामध्ये अनेक गायिकांना दिली ओळख 
- वीरपाल सिंह खरकिया हे बालपणापासून हरियाणाच्या संगितात वाढले. त्याचे गुरु आणि मोठे बंधु राजेंद्र सिंह खरकिया यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे धडे घेतले. 
- लोकगीत गायक वीरपालसिंह यांनी फक्त सपनालाच नाही तर हरियाणातील अनेक तरुण गायकांना संधी दिली आहे. हरियाणाची पहिली स्टार गायिका अन्नु काद्यान देखील त्यांची शिष्य. 
- त्यानंतर झज्जर येथील संगीता शर्मा,वीनू चौधरी, संगीता जांगडा, राकेश श्योराण, अंजली ठाकरान, दीपिका पंजाब, रेखा लांबा, बबली वर्मा, कोमल जाखड, छोटी सपना नावाने प्रसिद्ध प्रिया चौधरी अनेक मुलींना त्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या या लेकींनी जे यश मिळवले याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बातमीशी संबंधीत फोटो.. 

बातम्या आणखी आहेत...