आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलच्या शो मधून रागात बाहेर पडला हा सिंगर, नंतर केले असे ट्वीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कपिल शर्मा आणि विवाद आता जणू एक समीकरणच झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिंगर आणि म्युजिक डायरेक्टर अमाल मलिक शो मध्येच सोडून निघून गेला. पण अमालने या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे. इतर काम असल्याने अमाल काही वेळानंतरल या शो मधून बाहेर पडला असे त्याने सांगितले आहे.
 
मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार, 'नूर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम 'द कपिल शर्मा शो' च्या सेटवर पोहोचली होती. 'नूर' चे म्यूजिक डायरेक्टर्स अरमान आणि अमाल मलिकलाही कपिल च्या शो मध्ये बोलविण्यात आले होते. पण शुटींग सुरु झाल्यावर या अरमान मलिकला प्रेक्षकांमध्ये बसण्यास सांगण्यात आले. ही गोष्ट त्याचा मोठा भाऊ अमालला अजिबात आवडली नाही. त्यामुळे रागात तो या शोमधून बाहेर पडला.
 
काय म्हटले अमालने? 
 
पण अमालने आता त्यावर स्पष्टीकरण दिले आहे की, त्याने ट्विटरवर लिहीले की, "Just to clarify all the rubbish that's being spread, I couldn't make it to @KapilSharmaK9's show because of some work commitments...The funny part is @ArmaanMalik22 was never supposed to be on this episode, so I dunno how we left from the set when we we never arrived "

सेटवर लेट लतिफीसाठी प्रसिद्ध आहे कपिल, हे सेलेब्स झाले होते नाराज
बातम्या आणखी आहेत...