आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Singh Is Bliing' On The Sets Of 'Comedy Nights With Kapil'

कपिलच्या शोमध्ये 'सिंह इज ब्लिंग', पंजाबी गेटअपमध्ये अक्षय तर एमीने दाखवले स्टंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार आणि कपिल शर्मा - Divya Marathi
अक्षय कुमार आणि कपिल शर्मा

मुंबईः प्रभूदेवा दिग्दर्शित 'सिंह इज ब्लिंग' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्याने यातील कलाकार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री एमी जॅक्सन त्याच्या प्रमोशनमध्ये बिझी झाले आहेत. अलीकडेच हे दोघे सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या गाजत असलेल्या शोच्या सेटवर पोहोचले.
यावेळी पंजाबी गेटअपमध्ये अवतरलेला अक्षय कुमार शोचा होस्ट कपिल शर्मासोबत धमाल करताना दिसला. पंजाबी रंगात रंगलेल्या अक्षयने यावेळी भांगडासुद्धा केला. तर अभिनेत्री एमी जॅक्सन मंचावर चक्क स्टंट्स करताना दिसली.
अक्षयने शोमध्ये ट्रॅक्टरवरुन धमाकेदार एन्ट्री घेतली. नेहमीप्रमाणे कपिल शोमध्ये आलेल्या अभिनेत्रीसोबत अर्थात एमीसोबत फ्लर्टिंग करताना दिसला.
पुढे पाहा, 'कॉमेडी नाइट्स...'च्या मंचावर पोहोचलेल्या अक्षय आणि एमीची खास झलक...