आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly Calender 2015साठी क्रिस्टल डिसूजाने केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Telly Calender 2015च्या फोटोशूटमध्ये क्रिस्टल डिसूजा)
मुंबई: 'एक हजारो मे मेरी बहना है' आणि 'एक नई पहचान' फेम टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाने काही दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले. हे फोटोशूट तिने टेली कॅलेंडर 2015साठी केले. त्यामध्ये तिने ट्रॅडिशनल फ्लाइंग शिमेरी क्रिम अनारकली सूट परिधान केलेला आहे. सूटवर मरुन रंगाची बॉर्डर आहे आणि क्रिस्टलने वेणी घातलेली आहे. क्रिस्टलने या फोटोशूटची काही छायाचित्रे ब्लॅक लेसी गाऊन परिधान करून काढली. जॉर्डनमध्ये हे फोटोशूटच्या संध्याकाळी करण्यात आले आहे.
या फोटोशूटचे अनुभव शेअर करताना क्रिस्टल म्हणाली, 'टेली कॅलेंडर शूट करणे माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता. कपडे, केस आणि मेकअप सर्वकाही परफेक्ट होते. प्रामाणिकपण सांगायचे झाले तर, यापूर्वी मी कधीच इतकी सुंदर दिसले नाही. टेली कॅलेंडरसाठी हे माझे दुसरे वर्ष होते. मी खूप आनंदी आहे, की यावर्षी कॅलेंडरच्या शूटिंगसाठी जॉर्डनच्या लोकेशनची निवड करण्यात आली. मी इथून खूप चांगल्या आठवणी घेऊन जात आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा क्रिस्टल डिसूजाच्या या फोटोशूटची काही छायाचित्रे...